• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला

by Ganesh Dhanawade
September 30, 2023
in Guhagar
255 3
0
Accidental death of Deepak Bhuvad
501
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिपक भुवड यांचे अपघाती निधन

गुहागर, ता. 30 : पाचेरी आगर गावाचे उपसरपंच आणि कुणबी समाज संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते दिपक भुवड यांच्या अपघाती निधनाने सामाजिक चळवळीतील झुंजार कार्यकर्ता हरपला असल्याची भावना गुहागर तालुक्यातील अनेक कुणबी बांधवांनी व्यक्त केली. पाचेरी आगर येथे गुरुवारी गणपती विसर्जन मिरवणूकी दरम्यान झालेल्या अपघातात दिपक भुवड यांचा मृत्यू झाला होता. Accidental death of Deepak Bhuvad

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि गरिबीतून वर आलेल्या दिपक भुवड यांनी कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपली आर्थिक स्थिती सुधारली. कॉन्ट्रॅक्टर म्हणून अनेकांची घरांची कामे केली आहेत. गोरगरिबांना कमी रक्कमेतहि घरे बांधून दिली आहेत. आपल्या व्यवसायाला जोड म्हणून वाहने खरेदी केली. भुवड यांना पत्नी व मुलगा, मुलगी अशी दोन मुले आहेत. आपल्या कामातून वेळ काढून ते समाज संघटनेमध्ये सक्रिय नेहमीच दिसत. शांत आणि संयमी स्वभाव यामुळे अनेक लोकं त्यांनी जोडली होती. कुणबी समाज संघटनेचे कोणतेही उपक्रम असो, त्याठिकाणी दिपक भुवड हे असणारच असे समीकरण झाले होते. परस्पर विरोधी विचारांच्या लोकांशी समन्वय आणि संवाद ठेवून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी तडीस नेले होते. तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. दिपक भुवड यांच्या अपघाती निधनाचा मोठा धक्का हुमणे गुरुजी यांना बसला आहे. Accidental death of Deepak Bhuvad

सामाजिक कार्यात वावरत असताना प्रत्येकाच्या सुख दुःखात व मदतीसाठी नेहमीच धावून जाणारा कार्यकर्ता अशीही त्यांची ओळख होती. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अनंत चतुर्दशीच्या गणेश मूर्ती विसर्जनाची मिरवणूक बाहेर पडली. यावेळी दिपक भुवड यांच्या मालकीच्या टेम्पो मध्ये दोन मोठे गणपती होते. तर गाडीच्या पुढे डोक्यावर गणपती घेऊन जाणारे गावातील ग्रामस्थ होते. यावेळी वाडीत अडचण आल्याने गणपती सोबत गौराई सुद्धा विसर्जनासाठी घेऊन जात होते. गावात उपसरपंच असलेले दिपक भुवड आणि याच अपघातामध्ये मयत झालेली १७ वर्षीय कोमल भुवड यांच्या घरातील गणपतींचे या आधीच विसर्जन होऊन त्यांच्या घरातील नातेवाईक मुंबईतहि गेले होते. वाडीतील ग्रामस्थांसोबत मयत झालेल्या या दोन्ही व्यक्ती विसर्जन मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या.  Accidental death of Deepak Bhuvad

दरम्यान, विसर्जन मिरवणुक उतार असलेल्या रस्त्यावर आली असता गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे कळताच दिपक भुवड लगेचच गाडी थांबवण्यासाठी गाडीच्या समोरील चाका खाली येऊन झोपले. मात्र, उतार असल्याने गाडीचा चाक त्यांच्या शरीरावरून गेला आणि पुढची दुर्घटना घडली. त्यांच्या निधनाने गावांनी तालुक्यातील कुणबी समाज हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला कार्यकर्ता हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहेत. Accidental death of Deepak Bhuvad

Tags: Accidental death of Deepak BhuvadGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share200SendTweet125
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.