गुहागर नागरिक मंचच्या बैठकीत निर्णय
गुहागर, ता. 09 : शहराच्या विकास आराखड्या संदर्भातील सुनावणीला सोमवार (ता. 10 जून) पासून सुरूवात झाली आहे. या सुनावणीसाठी आलेल्या समितीला गुहागरवासीयांच्या भावना कळव्यात म्हणून गुरूवार 13 जुलैला निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा निर्णय गुहागर नागरिक मंचच्या रविवारी (ता. 9) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. Protest march on Thursday 13th July
गुहागर शहराच्या विकास आराखड्यांला (Guhagar Development Plan) नागरिकांचा विरोध आहे. अर्धा गाव सीआरझेड CRZ Zone) क्षेत्रात वसलेला आहे. त्यात सागरी महामार्ग (Costel Highway) , रुंद रस्त्यांसाठी आरक्षण (Reservation) याची भर पडल्यानंतर स्थानिकांच्या (Loacal Community) जागा इतक्या आकुंचीत होणार आहेत की जुन्या घराच्या दुरुस्तीला शासन परवानगीच देणार नाही. म्हणूनच वर्षानुवर्ष शहरात रहाणाऱ्या स्थानिकांची घरे, बागायती उध्वस्थ करणारा हा भकास आराखडाच नकोय. शहराच्या विकास आराखड्याचे प्रारुप प्रसिध्द झाल्यानंतर नागरिकांनी सर्वपक्षीय नागरिक मंचाची स्थापना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnvis, पालकमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) , भाजपचे रत्नागिरी जिल्हा पालक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavan), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली. विकास आराखडा रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी अधिवेशन सुरु असल्याने या नेते मंडळींनी जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याची सूचना केली. त्याप्रमाणे शहरातून 1501 हरकती नोंदविण्यात आल्या. Protest march on Thursday 13th July
Protest march on Thursday 13th July
सोमवार, दि 10 जुलैपासून या हरकतींवर सुनावणीला सुरवात झाली. त्यासाठी शासनाने नेमलेली सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचनाकार मिलिंद गुलाबराव आवडे, सेवानिवृत्त नगर रचनाकार शिवप्रसाद आत्माराव धुपकर, सेवानिवृत्त नगररचनाकार शेखर दत्तात्रय चव्हाण आणि वास्तुविशारद प्रियदर्शन श्रीधर कोपरकर यांची समिती गुहागरमध्ये दाखल झाली आहे.
या समितीपर्यंत गुहागर शहराचा एकत्रित आवाज पोचावा म्हणून गुहागर नागरिक मंचने मोर्चाचे आयोजन केले आहे. गुरुवारी 13 जुलैला सकाळी 9 वाजता गुहागरचे ग्रामदैवत भैरी व्याघ्रांबरी मंदिरापासुन या मोर्चाला सुरवात होईल. गुहागरच्या तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देवून हा मोर्चा गुहागर नगरपंचायत कार्यालयापर्यंत येईल. या ठिकाणी आलेल्या समितीला तसेच गुहागर नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता होईल. अशी माहिती गुहागर शहर नागरिक मंचाने दिली आहे. Protest march on Thursday 13th July