• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूर विठ्ठलाईदेवी मंडळाचा शताब्दी महोत्सव साजरा

by Ganesh Dhanawade
March 20, 2023
in Guhagar
55 0
0
Centenary celebration of Vitthalaidevi Mandal
107
SHARES
307
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कालावधील शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग तसेच अन्य धार्मिक, कला व क्रीडा यासारख्या विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

यामध्ये पहिल्या दोन दिवस जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. मंडळाचा संपादित केलेला गौरवशाली इतिहास स्मरणिकेच्या माध्यमातून संकलित करण्यात आला होता. सदर स्मरणिकेचे प्रकाशन या स्पर्धेदरम्यान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याचसोबत तिसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या तालुक्यातील पालशेत येथील जय हनुमान या ग्रुपने सादर केलेले विविध कलाविष्कार डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. सदर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या ग्रुपने उपस्थितांची मने जिंकली.

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

तसेच चौथ्या दिवशी सकाळ सत्रात आयोजित केलेल्या श्री विट्ठलाई मातेच्या चांदीच्या पादुकांची भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. ही पादुका मिरवणूक श्री विठ्ठलाईदेवी मंदिर पासून नवीन सुंकाईदेवी मंदिर ते पिंपळेश्वर मंदिर मार्गे साईबाबा मंदिर कडून विठ्ठलाईदेवी मंदिरात खालुजा बाजासहित सनई चौघडीच्या सुरात वाजत गाजत नेण्यात आली. दुपार सत्रात नागझरी गवळीवाडी मंडळाने सादर केलेले डेरा नृत्य प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर सन्मान स्त्री शक्तीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५४ महिलांनी सहभाग नोंदविला होता. तसेच रात्रीच्या सत्रात पुणे येथील प्रख्यात किर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई माने/ परांजपे यांचे सुश्राव्य किर्तन पार पडले. पहिल्यांदाच मंडळातर्फे आयोजित केलेल्या या किर्तन सेवेचा जिल्ह्याच्या विविध भागातील अनेक किर्तन रसिकांनी लाभ घेतला. याचसोबत पाच दिवसीय कालावधीत दररोज देवीचा महाभिषेक, महिला – पुरुषांचे स्वतंत्र संगीत भजने, देवीची महाआरती, महाभंडारा तसेच शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग संबंधित विविध धार्मिक विधी यावेळी पार पडले. Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

यावेळी अडूर सहाण ते श्री विठ्ठलाईदेवी मंदिर दुतर्फावर केलेली विद्युत रोषणाई व मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याला केलेली फळांची आकर्षक सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याचप्रमाणे पाचव्या शेवटच्या दिवशी मंदिरात श्री सत्यनारायण अर्थात विष्णू महापूजा मांडण्यात आली. या पूजेचे यंदाचे हे १०० वे वर्ष होते. तसेच दुपार सत्रात गुणवंत व मान्यवर सत्कार सोहळा पार पडला. रात्रीच्या सत्रात कोकणातील नामवंत संगीत भजनी बुवा विनोद चव्हाण व समीर कदम यांच्यात २० x २० भजनाची डबलबारी झाली. सरते दिवशी अर्थात सहाव्या दिवशी सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे विधिवत उत्तरपूजा करून मंडळाच्या वारकरी भजनाने बोऱ्या बंदरावर विसर्जन करण्यात आले. Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

Tags: Centenary celebration of Vitthalaidevi MandaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share43SendTweet27
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.