ग्रामविकास विभागाच्या विभागीय आयुक्त, जि.प.ना सूचना
गुहागर, ता.15 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीएससी-एसपीव्ही कडून नियुक्त केलेले मनुष्यबळ (संगणक परिचालक) हे कोणत्याही स्वरुपाचे शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी नसून ते स्वतंत्र मनुष्यबळ आहे. त्यामुळे या प्रकल्पाशी निगडीत मनुष्यबळाच्या सेवा ग्रामविकास विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय इतर कोणत्याही सेवांसाठी वापरण्यात येऊ नयेत, अशा सूचना शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. Problems with computer operators
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात आलेली आहेत. या केंद्रामधून प्रामुख्याने ग्रामपंचायतीतील 1 ते 33 रजिस्टर संगणकीकरण करणे, ग्रामस्थांना विविध दाखले देणे, केंद्र शासनाच्या 11 आज्ञावलीमध्ये माहिती भरणे व ग्रामस्थांना इतर बी 2 सी प्रकारच्या सेवा देणे ही कामे करण्यात येतात. Problems with computer operators
सदर प्रकल्पाचे सनियंत्रण सीएससी एसपीव्ही यांच्यामार्फत करण्यात येत असून प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक तसेच प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रासाठी एक केंद्र चालक असे मनुष्यबळ यांनी नेमणूक केलेली आहे. मात्र, त्यांना या प्रकल्पाच्या व्यतिरिक्त इतर कामे सोपविण्यात येत असल्याचे आढळून येते. त्याचा परिणाम आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प अंमलबजावणीसाठी करताना दिसून येतो. त्यामुळे दिलेली उद्दीष्टे पूर्ण होत नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. Problems with computer operators
या प्रकरणी वारंवार सूचना देऊनही त्यांचे पालन होत नसल्याचे दिसून येत नसल्याचेही ग्रामविकास विभागाने पत्रात नमूद केले असून या मनुष्यबळाकडे इतर सेवा द्यावयाच्या झाल्यास 3आँक्टोबर 2017 व 28 फेब्रुवारी 2019 रोजीच्या दिलेल्या पत्रात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी व सदर प्रकरणी शासन आदेशाची अवहेलना होणार नाही या खबरदारी घ्यावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी केल्या आहेत. Problems with computer operators
जिल्हा संगणक परिचालकांच्या समस्या सीईओंच्या दरबारी
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आपल्या विविध समस्या जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे 11 नोव्हेंबर 2022 रोजी पत्राद्वारे मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्र चालकांचे मानधन महिन्याच्या निश्चित तारखेला द्यावे, सुटीच्या दिवशी कामाची सक्ती करु नये, आपल्या कामाव्यतिरिक्त विभागातील कामाची सक्ती करु नये, अतिरिक्त कामांचा योग्य मोबदला मिळावा व कामासाठी योग्य वेळ मिळावा. सर्व तालुका समन्वयक यांनी केंद्र चालकांकडून काम करुन घेताना दबाव टाकून करुन घेऊ नये, अशा प्रकारच्या समस्या पत्रातून मांडल्या आहेत. Problems with computer operators

