पावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला
गुहागर, ता.18 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पुराचे पाणी भात शेतात कायम साचून राहिल्यामुळे सद्या पोटरी वळलेले या पिकावर मोठ्या पावसाने विपरीत परिणाम होण्याची भिती व्यक्त होत आहे. Rice crop in danger due to rain

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने व मेहनतीने यावर्षी शेती केली. रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे घराजवळ भात खाचरात मोठ्या प्रमाणावर भाताचे पिक घेतले आहे. त्यासाठी भाजावळी पूर्व मशागत व त्यानंतर नांगरणी साठी पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाताची शेती केली आहे. खते व मजुरी यावर शेतकऱ्यांचे भरपूर श्रम व पैसा खर्च झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस अशीच संततधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेहनत केलेल्या शेतकऱ्यांचे या पावसाने तोंडचे पाणीच पळवळे आहे. Rice crop in danger due to rain
गुहागर तालुक्यात भाताचे ४१०० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता हेक्टरी 3200 क्विंटल प्रती हेक्टर आहे. त्या खालोखाल नागलीचे तालुक्यात ३९५० हेक्टर क्षेत्र असून या पिकाची उत्पादकता 3200 क्विंटल प्रती हेक्टर आहे. नागली व वरी या पिकांचे तालुक्यात प्रत्येक गावात मोठे क्षेत्र होते. परंतू, जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. व घराजवळील खाचरात व सखल भागात भात पिकावर जोर धरला.
यावर्षी जून महिन्यापासून आजतागायत सुमारे तीन हजार मिलिमिटर एवढा पाऊस पडला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त वाढले. भात लागवडी नंतर तिसऱ्या महिन्यात भाताच्या काड्या पोटरी वळतात. व दाणे तयार होतात. यावेळी पावसाचे प्रमाण कमी असायला हवे. सप्टेंबरमध्ये भात खाचरात भाताच्या बुंध्यांशी कमी प्रमाणात पाणी असावे लागते. मात्र, सद्या कोसळणाऱ्या पावसामुळे भात खाचरात भात कांडया वरपर्यंत भिजताना दिसत आहेत. या अशा परिस्थितीत बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढते. किडींचा प्रादुर्भाव वाढतो व तो पिकाच्या दृष्टिने हानीकारक ठरतो. Rice crop in danger due to rain

कृषी खात्याचा सल्ला
गुहागर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार अशा पावसात भात नागली व नारळ सुपारी तसेच आंबा व काजू पिकावर बुरशी जन्य रोगावरील फवारणी करू नये. कारण पावसात ही फवारणी वाया जाऊ शकते. भात खाचरात साचलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी. खतांची मात्रा द्यावयाची असल्यास काही दिवस पाऊस थांबण्याची वाट पहावी असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. Rice crop in danger due to rain
