गुहागर, ता. 25 : शहरातील खरे ढेरे भोसले महाविद्यालयाचे (Khare Dhere Bhosle College) प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजता निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या अचानक निधनाने महाविद्यालयासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली. KDB College Principal Sawant No More
डॉ. अनिल सावंत हे गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयामध्ये 1992 पासून प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले. सुरुवातीला महाविद्याय विना अनुदानित होते. तेव्हापासून ते एकाच महाविद्यालयात पदवीधर अभ्यासक्रमामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 2018 पासून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. प्राचार्य पद रिक्त राहिल्यास सिनियर प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे अनेकवेळा प्राचार्य पद आले आहे. कोरोना काळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या बुध्दीला चालना मिळावी, यासाठी महाविद्यालयामार्फत अनेक ऑनलाईन कोर्स घेतले. आणि यशस्वीही केले. त्यांनी गुहागर न्यूज व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पत्रकारिता अभ्यासक्रम घेतला होता. याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. KDB College Principal Sawant No More
महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांशी थेट संपर्क असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील आवडी निवडी त्यांना चांगल्या माहीत होत्या. येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या हुद्यावर जाऊन गुहागरचे नाव मोठे करावे, अशी त्यांची प्रखर इच्छा होती. हे अनेकवेळा बोलूनही दाखवत असतं. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात डॉ. सावंत यांचे योगदान सर्वांनाच माहित आहे. उपक्रमशील आणि अत्यंत शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची विद्यार्थ्यांमध्ये ओळख होती. KDB College Principal Sawant No More

बुधवारी मोडकाघर येथील त्यांच्या राहत्या घरी रात्री बाराच्या दरम्यान त्यांना त्रास सुरू झाला. गुरुवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर अधिक उपचाराकरिता त्यांना गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर त्यांचा मृतदेह सांगली येथील विटा या गावी त्यांच्या घरी नेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी यासुद्धा गुहागर हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. वर्षभरापूर्वीच डॉ. अनिल सावंत यांच्या भावाचे कोरोनामध्ये निधन झाले होते. आणि त्यांच्या कुटुंबाला हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. KDB College Principal Sawant No More

