• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटीच्या “स्मार्ट कार्ड” योजनेला दोन महिने मुदतवाढ

by Mayuresh Patnakar
August 25, 2022
in Guhagar
16 0
0
Free travel for citizens above 75 years
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सवलत धारकांना ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करता येणार नोंदणी

मुंबई, दि. 25 : एसटीच्या प्रवासात विविध घटकांतील सवलत धारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.  मात्र, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांची तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये. यासाठी नागरिकांच्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने “स्मार्ट कार्ड” योजनेला नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. The deadline of ST’s “Smart Card” increased

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेली “स्मार्ट कार्ड” काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डासाठी नोंदणी करणे किंवा स्मार्टकार्ड घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशी निमित्त ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. The deadline of ST’s “Smart Card” increased

तथापि, पुढील आठवड्यात दि. ३१ ऑगस्ट ते दि. ९ सप्टेंबर २०२२ दरम्यान असलेला गणेशोत्सव तसेच दिवाळीच्या कालावधीतही ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण करणेसाठी दि. ३१.१०.२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानुसार सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. The deadline of ST’s “Smart Card” increased

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarsLatest News on GuhagarThe deadline of ST's "Smart Card" increasedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.