गुहागर, ता.13 : स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरची विद्यार्थिनी कुमारी आर्या मंदार गोयथळे हिचा ना. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. Goythale felicitated by Minister Samant


इयत्ता पाचवी मधील कुमारी आर्या मंदार गोयथळे हिने ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत 89.33 टक्के गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत आली होती. तसेच इयत्ता आठवी मधून न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेचा शाळेचा विद्यार्थि वेदांत किरण शिवणकर याने ८१.३० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते. त्याचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवोदयमध्ये निवड झालेले जीवन शिक्षण शाळा गुहागरचे स्वराज विक्रम शिंदे, अनिकेत अविनाश सावंत, सत्यजित जयेंद्र सानप, अपूर्वा मोहन पागडे, या सर्व गुहागर तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे सत्कार करण्यात येणार आहे. Goythale felicitated by Minister Samant

