दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 286
गुहागर तालुक्यात आज एका दिवशी 63 कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 286 वर पोचली आहे. त्याचप्रमाणे एका कोरोनाग्रस्तांचा आज मृत्यू झाला. तर वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरमध्ये आज एका रुग्णाला भरती करण्यात आले आहे.
गुहागर ग्रामीण रुग्णालयात केलेल्या ॲन्टीजेन टेस्टमध्ये 20 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तर आरटीपीसीआरसाठी पाठवलेल्या स्वॅबमधील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुहागर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीतून पाठवलेल्या 9 स्वॅबचा, आबलोली प्रा.आ.केंद्र 15 स्वॅब आणि तळवली प्रा. आ. केंद्र 14 स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील सर्व आस्थापना शनिवारी आणि रविवारी पूर्णपर्ण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन घेतला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार कोणीही फिरताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याची दखल गुहागर तालुकावासियांनी घ्यावी.
दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची आजची संख्या 522 असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 560 वर पोचली आहे.