अवघ्या 6 दिवसांत 209 रुग्णांची भर, दिवसभरातील रुग्णसंख्या 53
(टिप : आम्ही संक्षिप्त संदेशात रुग्णसंख्या 43 असल्याचे म्हटले होते. मात्र सर्व ठिकाणचे आकडे निश्चित झाल्यानंतर आजच्या रुग्णसंख्येत 10 ने वाढ झाली आहे.)
(बातमीमध्ये गावनिहाय दिलेली कोरोनाबाधितांची संख्या ही एकूण 347 आहे. याशिवाय तालुक्यातील 134 कोरोगाबाधितांची प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय यादी तालुका आरोग्य केंद्राला प्राप्त झाली आहे. मात्र त्यामधुन गावांचे वर्गीकरण करुन त्याचा समावेश तालुक्याच्या गावनिहाय यादी करण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे गावनिहाय संख्या 347 असली तरी तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 481 आहे.)
गुहागर ता. 22 : तालुक्यातील 50 गावात 481 कोरोना रुग्ण अशी आजची स्थिती आहे. तालुक्यातील 12 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोनारुग्ण आहेत. याशिवाय तालुक्याबाहेर शासनमान्य खासगी तपासणी केंद्रात कोरोनाग्रस्त असल्याचा निष्कर्ष निघालेले 14 रुग्ण आहेत. ज्यांची नोंद तांत्रिक कारणांमुळे गुहागर तालुक्याच्या संख्येत झालेली नाही. 16 एप्रिलला तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 286 होती. अवघ्या आठ दिवसात यामध्ये 195 आणि 14 अशा 209 रुग्णांची भर पडली आहे. (Today 481 Corona Positive Patient in Guhagar Taluka. Corona Spread in 50 Villages in Guhagar Taluka. )


गृह विलगीकरणाचे नियम न पाळणारे रुग्ण आणि सर्दी, ताप, खोकला लपवून ठेवणारे यांच्याकडून कोरोना वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष समोर येत आहे. कोतळूक गावाने आपल्याकडील रुग्णांची उत्तम व्यवस्था केल्यानंतर तेथील रुग्णसंख्या वाढ घटली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. परंतू गुहागर शहरात सातत्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आजही गुहागर शहरातील अनेक घरांमधुन लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त तपासणी विना फिरत आहेत. आजारी वृध्दांना तपासणीसाठी नेले जात नाही. त्यामुळे कोरोना फैलावत आहे. अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ( So many peoples are symptomatic, suspected. But they are not checked. Also the Home Isolated Patients are not following the Rules. Therefor corona spreading fast. Said Health Officer)


तालुक्यातील 10 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त असलेलेली गावे पुढील प्रमाणे
पालपेणे 10, चिखली 10, त्रिशुळ साखरी 11 चिंद्रावळे 12, कोतळूक, पवारसाखरी, आरेगांव या गावात प्रत्येकी 13, शृंगारतळी 14, गोणवली 15, आबलोली 23, वेळंब 44 तर गुहागर शहर 63 रुग्ण आहेत.
सुरळ, भातगांव, असगोली, पालकोट, दाभोळ (शृंगारतळीत फिरताना सापडलेला), मढाळ, शिवणे, विसापूर, पांगारी, गिमवी, देवघर, वाडदई, वाघांबे, वेलदूर घरटवाडी, पोमेंडी, झोंबडी, कोळवली या गावात प्रत्येकी 1 कोरोनाग्रस्त आहे. कौंढर काळसुर, अडूर, वेलदूर, पाभरे, परचुरी, मळण या गावांत प्रत्येकी 2 कोरोनाग्रस्त आहेत. 3 रुग्ण असलेल्या गावांमध्ये पिंपर, आरजीपीपीएल, खामशेत, मोडकाआगर, हेदवी यांचा समावेश आहे. पाटपन्हाळे व वरवेलीत प्रत्येकी 4 रुग्ण आहेत. पिंपळवट, तवसाळमध्ये प्रत्येकी 5 रुग्ण आहेत. रानवीमध्ये 6, खोडदेत 7, तळवलीत 8, पालशेतमध्ये 8 व निगुंडळ 9 अशी रुग्णांची संख्या आहे.