• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 September 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

‘मिशन महाग्राम’मध्ये चिपळूण, गुहागर तालुक्यांचा समावेश

by Mayuresh Patnakar
September 30, 2026
in Ratnagiri
16 0
0
33 villages in the district under Mission Mahagram
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्ह्यातील ३३ गावे; शाश्वत विकासासाठी गावाला १० लाखांचा निधी

गुहागर, ता. 30 : ग्रामीण भागातील दुर्गम, वंचित आणि विकासापासून काही प्रमाणात दूर राहिलेल्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला शासनाने २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली असून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात ३३ गावांची निवड करण्यात आली आहे. 33 villages in the district under Mission Mahagram

प्रत्येक निवडलेल्या गावासाठी शाश्वत विकासाचा आराखडा तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. सन २०१६ पासून सुरू असलेल्या या अभियानाचा मुख्य भर गावांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यावर आहे. सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास विभाग, युनिसेफ तसेच व्हीएसटीएफ यांच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. गावातील उपलब्ध साधनसंपत्ती, स्थानिक गरजा आणि विकासातील उणिवा यांचा अभ्यास करून त्यानुसार विकासाचे प्राधान्यक्रम निश्चित केले जाणार आहेत. सरपंच, ग्रामसेवकांसह बचत गटांना प्रशिक्षण अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, महिला बचत गट तसेच संबंधित घटकांसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. विविध शासकीय योजनांची माहिती, त्यांचा प्रभावी लाभ घेण्याची पद्धत तसेच डिजिटल पद्धतीने कामकाज करण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे.त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजाला अधिक गतिमानता आणि पारदर्शकता मिळण्याची अपेक्षा आहे. 33 villages in the district under Mission Mahagram

गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होणार गावांचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवरही विशेष भर दिला जाणार आहे. युवकांना शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचत गटांना विविध व्यवसायांसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाल्यास रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासही मदत होणार आहे. प्रत्येक गावात ग्राम समन्वयकाची नियुक्ती निवडलेल्या ३३ गावांमध्ये प्रत्येकी एक ग्राम समन्वयक नियुक्त केला जाणार आहे. हा समन्वयक गावात राहून ग्रामपंचायत, प्रशासन आणि अभियानातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कामांचा पाठपुरावा आणि गावाच्या विकास आराखड्याच्या पूर्ततेसाठी त्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 33 villages in the district under Mission Mahagram

३३ गावांना १० लाखांचा आधार
रत्नागिरी जिल्ह्यातील ३३ गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. मंडणगड़, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर आदी तालुक्यांतील गावांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक गावासाठी १० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक गरजेनुसार विकासकामांना गती मिळणार आहे.

२५ हून अधिक योजनांचा एकत्रित लाभ
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध विभागांच्या २५ हून अधिक शासकीय योजना एकाच छताखाली आणून त्यांचा एकत्रित लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, कौशल्य विकास, कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण यांसह विविध योजनांचा समन्वय साधून गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले जाणार आहे.

सीएसआर निधीचेही पाठबळ
शासकीय निधीसोबतच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात सीएसआरच्या माध्यमातूनही विकासकामांना आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ दिले जाणार आहे. व्हीएसटीएफच्या माध्यमातून आवश्यक निधी, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शासकीय योजनांच्या अंमलबजावणीला अधिक प्रभावी स्वरूप मिळणार आहे.

मानव विकास निर्देशांक उंचावण्याचे उद्दिष्ट
गावाचा केवळ भौतिक विकास न करता नागरिकांच्या जीवनमानात प्रत्यक्ष सुधारणा घडवून आणणे हे ‘मिशन महाग्राम’चे प्रमुख उद्दिष्ट आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यू रोखणे, शंभर टक्के लसीकरण, शाळाबाह्य व शाळा गळतीचे प्रमाण कमी करणे, सुरक्षित पाणी, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीतील निवडलेल्या ३३ गावांमध्ये नियोजनबद्ध विकासाची नवी दिशा निर्माण होऊन पुढील काळात या गावांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा कायापालट होण्याची अपेक्षा आहे. 33 villages in the district under Mission Mahagram

Tags: 33 villages in the district under Mission MahagramGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.