कोळथरेतील महाजन, पुजन केलेल्या मातीपासून बनवतात मूर्ती
गुहागर, ता. 27 : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज घरोघरी आकर्षक गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे. या उत्सवातून विविध परंपरांचे दर्शनही होत असते. कोळथरे (ता. दापोली) येथील महाजन कुटुंबात भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी पूजा केलेल्या मातीपासून गणपती बनवून (Hand-made Ganesh Idol) त्याची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा (Ganeshotsav Tradition) आहे. गेली 300 वर्ष ही परंपरा (300 Years Old Tradition) सुरु आहे.
दापोली तालुक्यातील कोळथरे येथे पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती आणण्याची परंपरा महाजन कुटुंब 300 वर्ष जपत आहे. भाद्रपदी गणेशोत्सवात बहुतांश ठिकाणी आदल्या दिवशी गणपतीची मूर्ती चित्रशाळेतून आणली जाते. महाजनांकडे मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशीच ही गणपतीची मूर्ती घरी हाताने बनवली (Hand-made Ganesh Idol) जाते.

पर्यावरणपूरक गणेशमुर्ती (Eco-friendly Ganesh Idol)
चतुर्थीच्या दिवशी पहाटे 5 वाजता महाजन मंडळी घरच्या देवांची पूजा करुन, सोवळे नेसून बाहेर पडतात. कोळथरे गावातील गणपती (बापेश्र्वर मंदिर) व कोळेश्र्वराचे दर्शन घेवून कुंभारवाडीतील डोंगराच्या पायथ्याशी जातात. जिथून माती घ्यायची त्या जागेची यथासांग पूजा केली जाते. तेथील घमेलभर माती घरी आणली जाते. सोवळे नेसूनच घरात गणपतीची मूर्ती बनवली जाते. या मूर्तीला रंग म्हणून शेंदूर लावला जातो. पूर्वी मुकुट आणि दागिने म्हणून सोनेरी कागद मुर्तीवर चिकटवला जायचा. आता साधे रंग वापरून गणपतीला अधिक आकर्षक बनविण्यात येते. साधारणपणे 4 ते 5 तासात गणपतीची मूर्ती तयार होते. याच मूर्तीची सुमारे 10 ते 11 च्या दरम्यान प्राणप्रतिष्ठा केली जाते. 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीबाप्पाला दाखविला जातो. रात्री आरती मंत्रपुष्पांजलीचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी या गणेशमुर्तींचे समुद्रात विसर्जन केले जाते. कोळथऱ्यातील महाजनांच्या 4 कुटुंबात अशा पध्दतीने भाद्रपदातील गणेशोत्सव साजरा केला जातो.
300 वर्ष जुनी परंपरा (300 Years Old Tradition)
सुमारे 300 वर्षांपूर्वी कै. नारायण विष्णू महाजन यांचे एकमेव घर कोळथऱ्यात होते. आज नारायण महाजन यांच्या कुळातील आगोम औषध उत्पादक महाजन म्हणजे विनायक, माधव, दिपक, वैद्य रामदास या बंधुंचे घर तसेच सुरेश महाजन, पद्माकर महाजन आणि श्रीकृष्ण गोविंद महाजनांच्या घरातील पेठे कुटुंब अशा 4 घरांमध्ये ही परंपरा सुरु आहे. 300 Years Old Tradition of Hand-made Ganesh Idol

पेठेही जपतात परंपरा
कोळथऱ्यांतील कै. श्रीकृष्ण गोविंद महाजन यांचा सुपारीचा मोठा व्यवसाय होता. मुलगा नसल्याने हा व्यवसाय तसेच इतर बागायती उत्पन्न सांभाळण्याकरीता त्यांचे जावई इंदुशेखर पेठे कोळथऱ्यात आले. महाजनांच्या घरी रहात असल्याने त्यांनीही येथील महाजनांच्या प्रथा परंपरा पुढे सुरु ठेवल्या आहेत. आता शेखर पेठे यांचा मुलगा सुनिल पेठे देखील महाजनांप्रमाणेच मातीचा गणपती बनवून पूजा करण्याची परंपरा जपत आहे. 300 Years Old Tradition of Hand-made Ganesh Idol
आजची पिढी ही जपत आहे परंपरा
या परंपरेबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले की, या परंपरेमागे वेगळा काही दृष्टीकोन नसावा. 300 वर्षांपूर्वी खेडेगावातून चित्रशाळा नसल्यामुळे अनेक ठिकाणी अशाच पध्दतीने घरोघरी गणपतींची स्थापना होत असेल. पुढे चित्रशाळा सुरु झाल्यावर आखिव रेखीव मूर्ती मिळू लागल्या. पण महाजन कुटुंबाने ही प्रथा पुढे सुरु ठेवली. आपणच श्रध्देने माती आणून घरी भक्तीमय वातावरणात गणपती बनविण्यात एक वेगळा आनंद मिळतो. समाधान मिळते. शिवाय ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे आमच्या पूर्वजांपासुन आजतागायत जपलेला वारसा आम्ही जपत आहोत. 300 Years Old Tradition of Hand-made Ganesh Idol
