पावसाळ्यापूर्वी मोडकाआगर पुलाचे काम होऊ द्या; गुहागरकरांची विनंती
गुहागर, ता. 01 : गुहागर विजापूर महामार्गाच्या कामासाठी 171 कोटी रुपयांची मंजुरी आली आहे. असे ट्विट केंद्रीय रस्ते व वहातूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गुहागरमधील व्यापाऱ्यांनी या ट्विटला उत्तर देताना आधी मोडकाआगरचा पुल पावसाळ्यापूर्वी होऊ द्या. नंतर नवीन काम सुरु करावे अशी विनंती गडकरींना केली आहे. ( Central Minister Nitin Gadkari twitted Upgradation of section of Guhagar-Chiplun Road on NH 166 E has been approved with a budget of 171 Cr has been approved. But Guhagarkar demanded to complete Modakagar Bridge on priority.)
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Guhagar Vijapur National Highway NH 166 E) गुहागर ते रामपुर या भागात सध्या तीन पदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये देवघर येथून या कामाला सुरवात झाली. आज मार्च अखेर मोडकाआगरमधील खातू मसाले उद्योगपासून मार्गताम्हानेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. (90 % Road work complited) या मार्गातील पुलांची कामे वेगाने सुरु आहेत. मात्र गुहागर ते मोडकाआगर दरम्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. तर मोडकाआगर येथील धरणावरील काम मे 2020 पासून रडतखडत सुरु आहे.
अजुन रामपुर ते चिपळूण या रस्त्याच्या कामाला सुरवात झालेली नाही. गुहागर ते रामपुर काम करणाऱ्या मनिषा कन्स्ट्रक्शन या ठेकेदारालाच हे काम मिळाल्याचे वृत्त आहे. आज केंद्रीय रस्ते व वहातूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुहागर चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता 171 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे ट्विट केले. हा निधी झालेल्या कामांचे पैसे देण्यासाठी की रामपुर ते चिपळूण मार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणार हे कळलेले नाही. मात्र नितीन गडकरी यांच्या ट्विटनंतर मोडकाआगर पुल आणि गुहागरमधील भुसंपादनाबाबतची (Land acquisition) चर्चा गुहागरमध्ये रंगु लागली आहे.
आधी मोडकाआगरचा पूल पूर्ण करा अशी मागणी गुहागरमधील व्यापारी हेमंत बारटक्के यांनी ट्विट करुन नितीन गडकरींकडे केली आहे. तर निखील तांबट यांनी म्हटले आहे की, निधी मंजुर झाल्याबद्दल आपला आभारी आहे. पण अजून गुहागर, मोडकाआगर, किर्तनवाडी तर्फे गुहागर या ठिकाणची साधी मोजणी सुध्दा झालेली नाही. ज्या जमीन मालकांच्या जागा जाणार आहेत त्यांना कोणतीही नोटीस नाही. त्यांची कीती जागा जाणार आहे याची माहिती नाही. याकडेही आपण लक्ष द्यावे अशी विनंती तांबट यांनी केली आहे.