शिव-प्रभा संस्था गुहागर आणि शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांचा उपक्रम
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा नं. 1 या शाळेत 80 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पागडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Various programs at Aabloli School No. 1
यामध्ये इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 – 26 मधील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी श्रेया शिवाजी साळवे, अर्णव अतिश रेपाळ, भालचंद्र स्वप्नील खेतल, वेदांत तृषान्त सुर्वे तसेच मंथन परीक्षेत राज्य, विभाग व केंद्र स्तरावरील पात्र 30 विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिना बद्दल मनोगतातून मौलिक माहिती दिली. Various programs at Aabloli School No. 1

“शिव – प्रभा” सामाजिक संस्था गुहागर या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष कुडली गावचे सुपुत्र आनंद शिवराम जाधव यांच्या वतीने इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना, विध्यार्थीनींना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले. याचवेळी “शांताराम चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई”या संस्थेचे अध्यक्ष व मुंबई आयकर विभागाचे प्रशासनिक अधिकारी आणि मासू गावचे सुपुत्र राजेश शांताराम मासवकर यांच्या वतीने इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थीर्नींना चांगल्या क्वालिटीची स्कूल बॅग आणि खाऊचे वाटप करण्यात आले. Various programs at Aabloli School No. 1
“शिव – प्रभा सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आनंद शिवराम जाधव, केंद्र प्रमुख सौ.पल्लवी पवार, मुख्याध्यापक गौतम लोणारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पागडे यांनी मौलिक मार्गदर्शन करुन विध्यार्थ्यांचे कौतुक करुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Various programs at Aabloli School No. 1
यावेळी केंद्र प्रमुख सौ. पल्लवी पवार,”शिव – प्रभा”या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद शिवराम जाधव,”शांताराम चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई”चे संस्थापक, अध्यक्ष राजेश शांताराम मासवकर, “शांताराम चॅरिटेबल ट्रस्टच्या” कोषाध्यक्षा सौ. संगीता राजेश मासवकर,माजी सभापती सौ. पूर्वीताई निमुणकर, माजी सरपंच नरेश निमुणकर, माजी सैनिक अनंत पवार, निलेश भंडारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पागडे, मुख्याध्यापक गौतम लोणारे, शिक्षक राजदत्त कदम आदी. मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी – पालक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन राजदत्त कदम यांनी केले. Various programs at Aabloli School No. 1
