• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 May 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत जलशक्ती अभियानाची आढावा बैठक

by Mayuresh Patnakar
April 15, 2022
in Ratnagiri
17 0
0
Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : जलशक्ती अभियान संदर्भात आढावा बैठक रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नूकतीच पार पाडली.  यावेळी या अभियानात करण्यात येणाऱ्या कामांच्या आराखड्यावर चर्चा झाली. अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलसाठ्यांचे पुनर्भरण, गावासाठी नव्याने पाणवठे बनविणे, कचरा साठून खराब झालेल्या पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन तसेच पाणथळ जागांची सफाई आणि वृक्षारोपण आदी कामांचा समावेश राहणार आहे. Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri

या अभियानात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्था तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असावा, यासाठीही नियोजन करा तसेच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे.  हे केवळ अभियान न राहता ती एक जन चळवळ बनली पाहिजे.  या भूमिकेतून यंत्रणानी काम करावे तसेच यात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग मिळवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले. Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri

ग्रामपंचातींनी उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्यासाठी गावासाठी गाव तलाव बनविण्याचे प्रस्ताव पाठवावेत या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येईल असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ग्रामपंचायतीनी आपल्या इमारतींच्या छतावर पाणी साठविण्यासाठी यंत्रणा उभारावी तसेच पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावात किमान दहा घरांच्या रेनवॉटर हार्वेस्टिंग साठी नियोजन करुन नागरिकांच्या सहाय्याने अधिकाधिक पाणी जमिनीत मुरेल यासाठी प्रयत्न करावेत.  

नगरपालिका क्षेत्रात देखील नगरपालिकांनी नव्या इमारतीत आरंभीच रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत काळजी घ्यावी व सध्या असणाऱ्या इमारती आणि घरांवरही अशी यंत्रणा उभारण्यासाठी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे. Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri 

जंगल हे पाण्याचा रखवालदार असे म्हटले जाते यामुळे जिल्ह्यात वनक्षेत्र वाढीसाठी वनीकरण वाढेल याकडेही लक्ष द्यावे.  शाळा महाविद्यालयांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाला झाडे दत्तक द्यावीत असे ते म्हणाले. Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri

महिला बचतगटाच्या माध्यमातून फळबाग, काजू, आंबा, मसाले तसेच बांबूची लागवड करता येईल याबाबत बचत गटांना वित्तसहाय देणे शक्य आहे.  यातून वनीकरण वाढण्यासोबतच महिलांना उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होईल अशा बाबतचे प्रस्ताव मागवून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. पाटील यांनी यावेळी दिल्या.  Meeting of Jalshakti Abhiyan at Ratnagiri

Tags: Collector Dr. BN PatilGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMeeting of Jalshakti Abhiyan at RatnagiriNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.