आमदार भास्कर जाधव; संधीचे सोनं कार्यअहवालाचे प्रकाशन
गुहागर, दि.14 : विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav) यांच्या 23 कोटींच्या कार्यअहवालात धोपावेच्या पाणी योजनेचा उल्लेख नाही. विक्रांतने हा अहवालात केवळ स्वबळावर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे विक्रांत माझा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून उभा रहातोय. अशी भिती वाटु लागली आहे. अशा शब्दात आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे कौतूक केले. Younger Vikrant Becomes Good Political Leadar
विक्रांत जाधव यांनी गेल्या ५ वर्षात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि १ वर्षांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा अहवाल संधीचं सोनं प्रसिध्द केला. या अहवालाचा प्रकाशन सोहळा आज पालपेणे येथील भवानी सभागृहात आमदार भास्कर जाधव आणि सौ. सुवर्णा जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. Younger Vikrant Becomes Good Political Leadar
कार्यअहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव म्हणाले की, 2017 मध्ये अंजनवेल जिल्हा परिषद गटाने सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला दिली. शरद पवार यांनी जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष नेता केले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena chief Uddhav Thackeray) एक वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. या संधीचं सोनं करताना तळवली येथील आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचा प्रस्ताव तयार करणे, भुमिपूजन करणे आणि इमारतीचे उद्घाटन पाच वर्षात करण्याची संधी मिळाली. जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीसाठी निधी आणता आला. जिल्ह्यात 57 रुग्णवाहिका देता आल्या. हे सर्व श्रेय जनतेचे आहे. Younger Vikrant Becomes Good Political Leadar
जिल्हाप्रमुख सचिन कदम (District Head Sachin Kadam) म्हणाले की, आमदार जाधवांप्रमाणे (MLA Bhaskar Jadhav) विकासकामे, संघटनात्मक बांधणी, आदी आघाड्यांवर विक्रांत यशस्वी होत आहे. जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर (Z.P. Member Mrs. Netra Thakur) म्हणाल्या की, विक्रांतदादाच्या झंझावातामुळे सर्वाधिक निधी आणण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक हुकल्याचे मत जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी सांगितले. Younger Vikrant Becomes Good Political Leadar
आमदार जाधव (MLA Bhaskar Jadhav) म्हणाले की, विक्रांतच्या डोक्यात हवा गेलेली नाही. आपल्या कार्यअहवालाचे प्रकाशन नेत्यांच्या उपस्थित करणे सहज शक्य होते. पण ज्या मतदारांनी संधी दिली त्यांच्यासमोर प्रकाशन करण्याचे विक्रांतने ठरविले. तो ज्येष्ठांचा मान ठेवतो. पद मिळाले म्हणून सहकाऱ्यांचा अपमान करत नाही. रागावर नियंत्रण ठेवतो. असे अनुभव सर्वांनी सांगितल्यावर मला अभिमान वाटतो. इतर नेत्यांची मुले काय करतात हे महाराष्ट्र पहातोय. त्याचवेळी विक्रांत जाधव (Z. P. President Vikrant Jadhav), रोहन बने, योगेश कदम यांच्यासारखी सुसंस्कृत तरुणांची फळी राजकारणात असल्याचा आनंद वाटतो. Younger Vikrant Becomes Good Political Leadar