गुहागर, ता. 17 : खेड तालुक्यात बारावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीनिमित्त मुंबई येथे गेलेल्या तरुणीचा अन्नातून विषबाधा झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी रत्नू रांगळे (वय 21 मूळ राहणार, सवणस खुर्द) असं या तरुणीचं नाव आहे. अश्विनी इयत्ता बारावीपर्यंत खेडमध्ये शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे आपलं करिअर करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेली होती, मात्र या दुर्दैवी घटनेने तिचं करिअर पूर्ण करण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं आहे. Young girl dies due to food poisoning

खेड तालुक्यातील सवणस-रांगळेवाडी येथील रहिवासी असलेली अश्विनी सध्या मुंबईतील घाटकोपर येथे राहत होती. अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Young girl dies due to food poisoning

मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेतलेली तरुणी काही दिवसांपूर्वीच नोकरीच्या निमित्ताने खेड येथे आपल्या गावावरुन मुंबईतील घाटकोपर इथे आली होती. १३ जुलै रोजी तिने काहीतरी खाद्यपदार्थांचं सेवन केलं होतं. बाहेरील पदार्थ खाल्ल्यानंतर तिला सलग दोन दिवस उलट्यांचा त्रास आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला होता. प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने मुंबईतील राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला. अश्विनीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असं कुटुंब आहे. तरुणीच्या आकस्मिक घटनेची नोंद मुंबईतील घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Young girl dies due to food poisoning