गुहागर, ता. 21 : पाटपन्हाळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या योग प्रशिक्षिका सौ आदिती गणेश धनावडे या उपस्थित होत्या. Yoga Day celebrated at Patpanhale College

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या हस्ते योगा प्रशिक्षिका सौ. आदिती धनवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, वुमन डेव्हलपमेंट सेल च्या सौ. सौम्या चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सौ. कदम आदी उपस्थित होते. योगा दिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सुमारे दीडशे विद्यार्थी योग प्रसिद्ध प्रात्यक्षिके करण्यासाठी सहभागी झाले होते. Yoga Day celebrated at Patpanhale College

यावेळी योग प्रशिक्षिका सौ. धनावडे यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व, प्राणायाम त्याचे विविध प्रकार, अनुलोम-नीलोम या सारखे विविध प्रकार घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यासाठी महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्रमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण सनये यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुभाष घडशी यांनी केले. Yoga Day celebrated at Patpanhale College