अखिल प्राथमिक शिक्षक संघ आयोजित
गुहागर, दि. 09 : अखिल प्राथमिक शिक्षक संघ शाखाचे वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून गुहागर पंचायत समिती शिक्षण विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षण अधिकारी माननीय भागवत मॅडम ,समग्र शिक्षा अभियान लेखाधिकारी श्रीमती नंदिनी कीर मॅडम, शालेय पोषण आहार डाटा एंट्री ऑपरेटर श्रीमती जानवळकर मॅडम, श्रीमती कविता घागरे मॅडम यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. World Women’s Day in Guhagar


त्यावेळी मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष मनोज पाटील म्हणाले की, महिलांनी सर्वच क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीचा आमच्या अखिल प्राथमिक शिक्षक संघाला सार्थ अभिमान वाटतो .आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. स्त्री शिक्षण उद्धारक क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे. म्हणून आपले आयुष्य पणाला लावले .म्हणून आज महिला उच्च स्थानावर सन्मानाने विराजमान झालेल्या आहेत. स्त्रियांमध्ये असलेली समर्पण वृत्ती, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळे स्त्रिया आत्मनिर्भर होऊन सर्वच क्षेत्रावर आपल्या कर्तृत्वाने अधिराज्य गाजवीत आहेत. World Women’s Day in Guhagar
गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती शिक्षण विभागातील सहकारी महिलांना सन्मानित केल्याबद्दल अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे आम्ही ऋणी आहोत .अखिल प्राथमिक शिक्षक संघाच्या माजी राज्याध्यक्ष कै. सुलभाताई दोंदे यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कामकाजात मला सर्वांचेच सहकार्य लाभत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. World Women’s Day in Guhagar
त्यावेळी अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश बोले, माजी सरचिटणीस अशोक पावस्कर, अष्टपैलू शिक्षक श्री बाबासाहेब राशिनकर, पंचायत समिती शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी वृंद व संघटनेचे तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते . World Women’s Day in Guhagar

