• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे खरेकोंड शाळेत जागतिक मृदा दिवस

by Guhagar News
December 6, 2022
in Guhagar
114 1
0
World Soil Day

World Soil Day

224
SHARES
641
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 (श्रुतिका गुहागरकर) : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व जागतिक मृदा दिवस (World Soil Day) सोमवारी (ता. 5) साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जि. प. पूर्व प्राथमिक शाळा, पेवे खरेकोंड. येथे आयोजित करण्यात आला होता.

World Soil Day
World Soil Day at Peve Kharekond

या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी क्षीरसागर, कृषी पर्यवेक्षक गवारी, कृषी सहाय्यक अमित शेळके, पेवें गावच्या सरपंच भारती सावरटकर, मुख्याध्यापिका दाभोळकर, सोबत उमेश साळवी, व सचिन साळवी इ. मान्यवर उपस्थित होते. World Soil Day

दीपप्रज्वलन आणि रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्षीरसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सचिन साळवी यांनी सेंद्रिय शेती याबद्दल माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, काळीमिरीची शेती, शेतीवर पडणारे रोग व त्यांचे नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी विषयक अवजारे आणि विविध योजनांची माहिती देणारे फलक यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सोबतच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी गांडूळ खताचे वाटप करण्यात आले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. World Soil Day

World Soil Day
World Soil Day at Peve Kharekond

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले. तसेच हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुनील कुमार पाटील आणि प्राध्यापक पी. बी. पाटील व निशिकांत पाकळे यांच्या मार्गदर्शनातून पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन तनय सावंत, सूरज पालकर अब्दुल शेख सौरभ निंबरे, गणेश व्होरकाटे आणि रितिक येलवे यांनी केले होते. World Soil Day

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorld Soil Dayटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.