रत्नागिरी जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने आयोजन
गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याचे ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो. यावर्षी जागतिक छायाचित्रण दिनाचे आयोजन गुहागर येथे करण्यात आले आहे. World Photography Day
जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचं जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्याचे हे दहावे वर्ष आहे. यावर्षी जागतिक छायाचित्र दिन अर्थात वर्ल्ड फोटोग्राफी डे चा हा कार्यक्रम रविवार दि 17 ऑगस्ट 2025 रोजी स.9 ते सायं.6 वाजे पर्यत गुहागर तालुका असोसिएशनच्या वतीने गुहागर शहरातील भंडारी हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे आहे. यावेळी फोटोग्राफर स्नेह मेळावा, फोटो फेअर, फोटोग्राफर साठी कार्यशाळा, अशा प्रकारचे याचे स्वरूप असणार आहे. World Photography Day

कार्यक्रमाच्या ठिकाणी फोटोग्राफीशी संबंधित विविध कंपन्यांचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध अल्बम लॅब धारक, फोटो फ्रेम मेकर्स, कॅमेरा डीलर्स, प्रिंटर डीलर्स, नामांकित कंपन्यांचे नवीन कॅमेरे डीलर, तसेच जुने कॅमेरे व लेंसेस विक्रेते, फोटोग्राफी क्षेत्रात लागणाऱ्या ॲक्सेसरीज यांचे विक्रेते, यांचे स्टॉल मोठ्या संख्येने उपलब्ध असणार आहेत. कॅमेरे सर्व्हीसिंग चा स्टॉल ही येथे उपलब्ध असणार आहे. तसेच यावेळी फ्री कॅमेरा सर्व्हीसिंग देखील करून दिली जाणार आहे. फोटोग्राफर बंधू प्रशिक्षित ,प्रगत व संघटित व्हावेत यासाठी जिल्हा असोसिएशनच्या वतीने शेकडो कार्यशाळा, वेबीनार, सामाजिक उपक्रमाचे आयोजन या आधीही करण्यात आले आहे. World Photography Day

यावेळी महाराष्ट्रातील फोटोग्राफी क्षेत्रातील प्रसिद्ध प्रशिक्षक मा.प्रमोद गायकवाड सर यांचे वेडिंग फोटोग्राफी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये फोटोग्राफर बंधूनी आपला वेडिंग फोटोग्राफी बिझनेस कसा वाढवावा, वेडिंग फोटो ग्राफी मधील टिप्स आणि टेक्निक्स, तसेच वेडिंग फोटोग्राफी क्षेत्रातील संपूर्ण मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मॉडेल घेऊन फोटोग्राफी प्रात्याक्षिक यावेळी करून दाखवले जाणार आहे. तरी फोटोग्राफर बंधूनी वर्कशॉप वेळी कॅमेरे सोबत ठेवावे जेणेकरून प्रात्यक्षिक मध्ये सहभाग घेता येईल, असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. World Photography Day
तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक फोटोग्राफर तसेच छायाचित्र प्रेमींनी गुहागर येथे होणाऱ्या जागतिक छायाचित्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे व या फोटो फेअरचा आणि स्नेह मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा व गुहागर तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी 150/-रू प्रवेश शुल्क असणार आहे. World Photography Day