• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारत आणि ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३

by Guhagar News
November 17, 2023
in Bharat
120 1
1
World Cup will be played in India and Australia
235
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने आफ्रीकेवर मिळवला थरारक विजय

कोलकत्ता, ता. 17 : वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारे दोन संघ ठरले आहेत. कोलकत्ताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २१३ धावांची गरज होती. World Cup will be played in India and Australia

आव्हान तसं मोठं नव्हतं. मात्र दक्षिण आफ्रिकच्या गोलंदाजांनी संघर्ष करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा चांगलाच घाम काढला. शेवटी ऑस्ट्रेलियाने बाजी मारत ३ गडी राखून विजय मिळवला. या थरारक विजयानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. २१३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने ३० धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नर २९ धावा करत माघारी परतला. World Cup will be played in India and Australia

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण कर्णधार टेम्बा बावूमा पहिल्याच षटकात शून्यावर माघारी परतला. तर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फलंदाज क्विंटन डी कॉक ३ धावा करत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं इथे कौतुक करावं लागेल. कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सेट होऊ दिलं नाही. रासी वान दर दुसेन ६, एडेन मार्करम १० धावा करत माघारी परतले. World Cup will be played in India and Australia

टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर हेनरी क्लासेनने डेव्हिड मिलरसोबत मिळून डाव सावरला. हेनरी क्लासेनने अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना ट्रेवीस हेडने त्याला ४७ धावांवर बाद करत माघारी धाडलं. क्लासेन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने मोर्चा सांभाळत एक बाजू धरून ठेवली. त्याने ११६ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २१२ धावांपर्यंत मजल मारली. World Cup will be played in India and Australia

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७० धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळताना दिसून येणार आहेत. World Cup will be played in India and Australia

Tags: AustraliaGuhagarGuhagar NewsIndiaIndia and AustraliaLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorld CupWorld Cup will be played in India and Australiaटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.