डिजिटल घटकाचा वापर करताना सतर्कता अधिक महत्त्वाची; राजेंद्र चव्हाण
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘बँकिंग क्षेत्रातील बदल’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एचडीएफसी बँक शृंगारतळीचे शाखा व्यवस्थापक श्री राजेंद्र चव्हाण सर उपस्थित होते. Workshops in Patpanhale Colleges

सध्याचे युग हे डिजिटल झालेले आहे. डिजिटल घटकांचा वापर करताना सर्वांनीच सावधानता बाळगून तसेच सतर्क राहून कसे व्यवहार करावेत अन्यथा मोठ्या प्रमाणात फसवणूक कशी होऊ शकते. या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रामुख्याने मोबाईलचा वापर करताना ज्या ज्या वेळी आर्थिक व्यवहार होतात. त्यावेळी आणि विविध लिंक मोबाईलवर ज्यावेळी येतात त्यावेळी कोणत्या गोष्टी करावयाच्या आणि कोणत्या गोष्टी टाळावयाच्या याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कोरोना काळापासून डिजिटल घटकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचबरोबर फसवणुकीचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे. त्यापासून आपण कशाप्रकारे काळजी घ्यावयाची याचे सविस्तर विवेचन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. बँकिंग क्षेत्रामध्ये नवनवीन कोणकोणत्या गोष्टी आणि तंत्रज्ञान आलेले आहे याची सविस्तर माहिती देऊन यामध्ये प्रामुख्याने बँकिंगचे विविध ॲप, स्कॅनर, ऑनलाइन व्यवहार, डेबिट क्रेडिट कार्ड आणि मोबाईलवर येत असलेल्या विविध लिंक याविषयी माहिती दिली. Workshops in Patpanhale Colleges

तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये करिअर करावयाचे असल्यास विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे तयारी करावयाची याची माहिती दिली. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम तसेच सिबिल स्कोर या संदर्भात सविस्तर माहिती देऊन विद्यार्थी जीवनामध्ये देखील त्याचा वापर आपण कशाप्रकारे करू शकतो आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये आपल्याला नवीन बदललेल्या तंत्रज्ञानाचा कसा वापर होऊ शकतो. या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Workshops in Patpanhale Colleges
या कार्यक्रमावेळी यावर्षीच्या वाणिज्य मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे श्री राजेंद्र चव्हाण सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी ए देसाई, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा.कांचन कदम मॅडम आणि प्रा. सुभाष घडशी व वाणिज्य शाखेतील प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता आंबेकर, प्रास्ताविक आनंदीता आग्रे आणि समारोप ऋतुजा भेकरे हिने केला. Workshops in Patpanhale Colleges