• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 March 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर महाविद्यालयात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक्स अँड टूल्स’ कार्यशाळा

by Guhagar News
March 13, 2026
in Guhagar
18 0
0
Workshop at Velneshwar College
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने “प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेक्निक्स अँड टूल्स” या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी ठाणे येथील कारखानिस कन्सल्टंट्सचे श्री. संतोष कारखानिस (Global SCM आणि SAP Specialist, AI व TOC-LT Expert तसेच उत्पादन क्षेत्रात उत्पादकता आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात कार्यरत) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. Workshop at Velneshwar College

Workshop at Velneshwar College

कारखानिस यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील आधुनिक तंत्रे, विविध व्यवस्थापन साधने, उद्योग क्षेत्रातील त्यांचा प्रत्यक्ष वापर तसेच प्रकल्पांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत प्रोजेक्ट प्लॅनिंग, रिसोर्स मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या पद्धती यांवर विशेष भर देण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख ज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन तंत्रांची माहिती मिळाली. Workshop at Velneshwar College

Workshop at Velneshwar College

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून. विद्यार्थ्यांनी चर्चासत्रे, प्रात्यक्षिके आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. हृषिकेश भावे यांनी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. Workshop at Velneshwar College

Workshop at Velneshwar College

ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी तसेच उद्योग क्षेत्रातील आधुनिक प्रकल्प व्यवस्थापन पद्धती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले.  प्रा. नयना फणसे यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. असेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मेकॅनिकल विभाग कटिबद्ध असल्याचे विभागप्रमुख प्रा. हृषिकेश भावे यांनी सांगितले. Workshop at Velneshwar College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorkshop at Velneshwar Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.