• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 March 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संस्कृतच्या २४०० शब्दांना शोधले मराठी प्रतिशब्द

by Guhagar News
March 30, 2026
in Ratnagiri
19 0
0
Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center
37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात कार्यशाळा

रत्नागिरी, ता. 30 : वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय) भारत सरकार आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतमधील २४०० शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यात आले. भारतातील ज्ञानपरंपरा आणि प्रथांची विद्यार्थ्यांसाठी परिभाषा-कोश (संस्कृत–मराठी) भारतीय ज्ञान परंपरेचा शिक्षार्थी कोश निर्मिती या विषयावर पाच दिवसांची कार्यशाळा संस्कृत उपकेंद्रात झाली. Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center

Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center

संस्कृत भाषेतील शब्दांना मराठीतील शब्द शोधण्यासाठी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ. निधी पटवर्धन, प्रा. प्रज्ञा भट, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, संस्कृत अभ्यासिका अक्षया भागवत, बेंगळुरू येथील अगस्त्य गुरुकुलातील सहाय्यक आचार्या प्रा. पूर्वा चुनेकर, प्रकल्प सहाय्यक व संशोधिका प्रा. सई ओक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे समन्वयक स्वरूप काणे या सर्वांनी शब्दांवर सखोल व साधकबाधक चर्चा करत आणि भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित शब्द शोधले. Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center

हे शब्द वेद, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, कला, ज्योतिष, रसायनशास्त्र, साहित्य, स्थापत्यशास्त्र इत्यादी ४० हून अधिक विषयांशी संबंधित आहेत. एकत्रित सहकार्याने आणि चर्चांमधून प्रत्येक संज्ञेचा अर्थ, संदर्भ व उपयोग यांचा बारकाईने विचार करूनच या शब्दांची निश्चिती करण्यात आली आहे. Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center

कार्यशाळेत सहभागी विशेषज्ञांना विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ.अतुल वैद्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेच्या समाप्ती दिवशी वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोगाचे डॉ. शहजाद अंसारी, डॉ. संजय गायकवाड, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि विशेषज्ञ, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. Workshop at Ratnagiri Sanskrit Sub-Center

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorkshop at Ratnagiri Sanskrit Sub-Centerटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.