जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले; आविष्कार संस्थेत कार्यशाळा
Guhagar News (रत्नागिरी) : दिव्यंगत्वाचे निदान लहान वयातच होणे आवश्यक आहे. (Disability Diagnosing Essential at early Age) दिव्यांग मुले जन्मतःच शोधली पाहिजे. अंगणवाडी सेविकांसह प्राथमिक शिक्षकांची ही जबाबदारी आहे. वर्गात मुलं मागे पडली तर शिक्षकांनी ओळखले पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले. जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्थेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), जिल्हा शासकीय रुग्णालय आणि आविष्कारच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.Workshop at Aavishkar Institute
Workshop at Aavishkar Institute
दिव्यांग विद्यार्थी सामान्यांपेक्षा एखाद्या कला, कौशल्यात पुढे जाऊ शकतो. यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करत राहणे हे दिव्यांगांला अधिक बळ देण्याचे काम करणे हे शिक्षकांचे आहे. आविष्कार संस्थेने काढलेल्या स्वयंसेतू अभ्यासक्रम पुस्तिकेचे वाचन करावे. आज शहरातील ४० शाळांतील शिक्षक आले आहेत. जिल्ह्यातील शिक्षकांनाही बोलावून कार्यशाळा घेऊ, असे प्रतिपादन डाएटचे प्राचार्य प्रा. सुशील शिवलकर यांनी केले. या वेळी अपंगत्व आलेल्या हंगेरियन सैनिकाने तीन वेळा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्याची गोष्ट सांगून त्यांनी दिव्यांगही यशस्वी होतात. त्यासाठी आपल्या साऱ्यांचे सहकार्य हवे आहे. कोणतीही कठीण गोष्ट करता येते, हे सांगताना त्यांनी एक दिवशीय सामन्यात द्विशतक करण्याचा पराक्रम मास्टरब्लास्टर सचिनने (Sachin Tendulkar) केल्याचे सांगितले. आविष्कार संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे पुनर्वसनही झाल्याबद्दल अभिनंदन केले. Workshop at Aavishkar Institute
कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरणात (New Education Policy) समावेशित शिक्षण यासंदर्भात डॉ. संदीप पवार यांनी सुरेख मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भविष्यात सर्वसमावेशित शिक्षणामुळे सामान्य शाळेतील शिक्षक विशेष शाळेत शिकवायला येऊ शकतात व इथले शिक्षक तिथे जाऊ शकतात. तज्ज्ञ अमर घाटगे यांनी दिव्यांगाप्रती समतेची भावना असली पाहिजे, यासंदर्भात मार्गदर्शन केले. Workshop at Aavishkar Institute. कार्यशाळेचे अध्यक्ष नितीन कानविंदे यांनी संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. दिव्यांग दिन साजरा करण्याची वेळच येणार नाही, असा आशावाद नितीन कानविंदे यांनी व्यक्त केला.Workshop at Aavishkar Institute
या वेळी कार्यकारिणी सदस्य सचिन सारोळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार आविष्कारच्या उपाध्यक्ष दीप्ती भाटकर यांनी केला. शामराव भिडे कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर व सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी यांनी आविष्कार कार्यशाळा व शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना घुडे यांनी केले. प्रमिला मावळणकर यांनी आभार मानले. Workshop at Aavishkar Institute