गुहागर, दि.11 : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै.विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय गुहागर. (Shri Dev Gopalkrishna Madhyamik Vidya Mandir, S.S. Patil Science, Shri Mahesh Janardan Bhosale Commerce and Late Vishnupant Pawar Arts Junior College Guhagar.) या महाविद्यालयामध्ये दि.8 मार्च रोजी महिला दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला’ दुर्गाशक्ती’ संस्थेच्या अध्यक्षा सौ. अश्विनी भुस्कुटे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Women’s Day in Guhagar College


सौ. भुस्कुटे मॅडम म्हणाल्या कि, विद्यार्थिनींनी स्वयं प्रकाशित होऊन स्वताःचा उद्धार करावा. येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जावे, आत्मनिर्भर होऊन स्वतःचा विकास कसा करायचा, तसेच स्वसंरक्षण कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले. Women’s Day in Guhagar College


या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. खोत सर होते. प्रा.बावधनकर मॅडम यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. प्रा. पालशेतकर मॅडमनी उपसस्थितांचे आभार मानले. Women’s Day in Guhagar College


या कार्यक्रमसाठी मुख्याध्यापक श्री. आडेकर सर, उपमुख्याध्यापक श्री.कांबळे सर, पर्यवेक्षक श्री. कोरके सर यांनी सहकार्य केले. Women’s Day in Guhagar College


तसेच प्रा.भाटकर मॅडम व प्रा.परचुरे मॅडम उपस्थित होत्या. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.Women’s Day in Guhagar College

