गुहागर, दि.12 : मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उप परिसराच्या महिला विकास कक्ष तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याख्याने आयोजित करून महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्ष अॅड. शबाना वस्ता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा पुजारी मॅडम संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. Women’s Day at Mumbai University Ratnagiri


या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना उप परिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये उप परिसरातील शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीचा आढावा घेतला. Women’s Day at Mumbai University Ratnagiri
अॅड. शबाना वस्ता यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना योग्य न्याय देण्याकरिता करण्यात आलेल्या विविध कायद्याबाबत माहिती दिली. कायदे व त्यातील तरतुदी तसेच काळानुसार त्यात केलेल्या आवश्यक सुधारणा याबाबत बोलताना बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता व बालकांच्या हक्काच्या संरक्षणाकरिता असलेल्या पॉक्सो कायद्याबाबतही विस्तृत विवेचन केले. महिलांना आधाराची नाही तर ‘तू हे करू शकतेस’ अशा विश्वासाची गरज असते असे प्रतिपादन करून त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. Women’s Day at Mumbai University Ratnagiri
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा पुजारी यांनी स्त्रियांना महत्त्वाच्या असणारा समान दर्जा व स्त्रियांची विविध क्षेत्रातील उन्नती, स्त्रियांची बलस्थाने तसेच स्त्रीचे समाज जीवनातील महत्त्व यावर भाष्य केले. Women’s Day at Mumbai University Ratnagiri
या कार्यक्रमासाठी उप परिसरातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महिला दिनाच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्तते बद्दल महिला विकास कक्ष व एनएसएस विभागातील सर्व प्राध्यापकांचे संचालक डॅा. किशोर सुखटणकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेविका कू. साक्षी चाळके व कू. भाग्यश्री पावसकर यांनी केले. Women’s Day at Mumbai University Ratnagiri

