तळवलीतील घटना, महिलेच्या हुशारीमुळे संकट टळले
गुहागर,ता. 17 : पॉलिश करण्यासाठी सोन्याचे दागिने पॉलिश मागणाऱ्या दोघांना तळवतील ग्रामस्थांनी चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले. मात्र सदर घटनेबाबत कोणीही फिर्याद दाखल केली नाही. बुधवारी (ता. 16) रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्यांची चौकशी केली. रेकॉर्ड तपासले. मात्र सबळ कारण नसल्याने या दोघांना सोडून दिले आहे. औषध विक्रेत्या महिलेच्या हुशारीमुळे या दोघांचा बनाव यशस्वी झाला नाही. woman’s ingenuity
ग्रामस्थांकडून कळलेल्या माहितीनुसार गुहागर तालुक्यातील तळवली गावात बुधवारी (ता. 16) दुपारी दोन तरुण मानसी देवकर यांच्या घरी गेले. आपण तांब्या पितळेची भांडी, तसेच सोन्याचे दागिने पॉलिश करुन देतो असे सांगितले. त्यांनी सुरवातील भांड्याचा आग्रह धरला. श्रीम. देवकर यांनी नकार दिल्यावर सोन्याचे दागिने पॉलिशसाठी मागितले. त्याला नकार दिल्यावरही हे दोघे ऐकत नव्हते. औषधांचे दुकान असलेल्या मानसी देवकर यांना संशय आला. त्यांनी तातडीने फोन करुन काही ग्रामस्थांना बोलावले. आलेल्या ग्रामस्थांनी या दोन तरुणांची चौकशी केली. त्यावेळी आम्ही बिहारमधुन आल्याचे तरुणांनी सांगितले. ओळखपत्राची मागणी केल्यावर त्यांनी दिलेली आधारकार्ड बनावट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या तरुणांना चोप दिला. गुहागर पोलीसांना कळवून त्यांच्या ताब्यात दिले. woman’s ingenuity
गुहागर पोलीसांनी रात्री उशिरापर्यंत या दोन तरुणांची चौकशी केली. त्यांचे रेकॉर्ड तपासले. पुढील कारवाईसाठी तळवलीतील ग्रामस्थांना फिर्याद दाखल करण्याची विनंती केली. मात्र कोणीही फिर्याद न दिल्याने अखेर दम देवून या तरुणांना सोडून देण्यात आले. woman’s ingenuity