गुहागर, ता. 29 : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत खेड तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. तालुक्यातील ७ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण १९ तर १४ पंचायत समिती गणांसाठी तब्बल ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या २७ जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी ८ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती गणातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. Withdrawal of candidates in Khed taluka
त्यामध्ये जिल्हा परिषद सुकीवली गटातून विनायक निकम, दिव्या होळकर, भरणे गटातून रोशनी साळवी, दयाळ गटातून श्रीधर गवळी, नागेश धाडवे, नफीसा परकार, जलालुद्दीन राजपुरकर तर विराचीवाडी गटातून स्वाती चांदिवडे यांनी अर्ज माघारी घेतला आहे. Withdrawal of candidates in Khed taluka

सुकीवली पं.स. गणातून प्रियांका चोचे, खवटी गणातून ज्योती बोरकर, भरणे गणातून राजेश जाधव, चंद्रशेखर हेळगावकर, नीलेश बामणे, दयाळ गणातून करुणा शिर्के, बहीरवली गणातून खालीद परकार, सलीम तांबे, नफीसा परकार, सईद हमदुले, गुणदे गणातून संतोष पाटोळे, लोटे गणातून जितेंद्र आंब्रे व संजय आंब्रे तर जामगे गणातून सुसंध्या मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत नामनिर्देशन स्वीकारणे, छाननी, माघार, मतदान व मतमोजणीसाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली असून मतदान ५ फेब्रुवारी रोजी, तर मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी व मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी तालुका क्रीडा संकुल, खेड येथे स्ट्रॉग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. Withdrawal of candidates in Khed taluka