गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिगल कॉलेज शृंगारतळी येथे १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव, पाककला स्पर्धा, प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रानभाज्यांपासून केक, पराठे, मिल्क शेक, फ्रेंच फ्राईज, पुडिंग, पिता ब्रेड, इडली, पनीर मसाला, सँडविच, मोदक, वड्या, बांबूच्या कोंबापासून भजी इ. नाविन्यपूर्ण पाककृती बनविण्यात आल्या होत्या. Wild Vegetable Festival at Regal College
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री राजन दळी (मालक, कृपा औषधालय धोपावे), मा. श्री. सत्यवान दर्देकर(मालक, आजोळ कृषी पर्यटन केंद्र, परचुरी), मा. श्रीम.पूजा डाकवे(मुख्याध्यापिका सरस्वती विद्यामंदिर जामसुत), मा. श्री.शिवाजी शिंदे (उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण), मा. श्री.अमोल क्षीरसागर (तालुका कृषी अधिकारी गुहागर), मा.श्री.कुणाल मंडलिक (प्राध्यापक, रामराजे महाविद्यालय दापोली) उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम रिगल कॉलेज प्राचार्य रेश्मा मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. त्यानंतर मा. सौ. पूजा डाकवे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. Wild Vegetable Festival at Regal College

या स्पर्धेमध्ये रिगल कॉलेज शृंगारतळीच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच खुल्या गटामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पावसाळी ऋतूमध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. याचेच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्त्व, त्यांची ओळख आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने रिगल कॉलेजमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Wild Vegetable Festival at Regal College
यावेळी श्री. दळी यांनी विविध रानभाज्यांची माहिती सांगितली. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने रानभाज्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील असे सुचवले. मा श्री दर्देकर यांनी रानभाज्या ऋतुनुसार खाल्ल्यामुळे होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच कोकणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न करायला हवेत, असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. सौ. डाकवे यांनी विविध रानभाज्यांची माहिती दिली तसेच विविध रानभाज्यांचे आयुर्वेदिक गुणधर्म बघून त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे असे सांगितले. श्री शिंदे यांनी रानभाज्या निसर्गतः उगवल्यामुळे त्या पूर्णपणे सेंद्रिय आहेत. सर्व मान्यवरांनी हा महोत्सव रिगल कॉलेज, शृंगारतळी येथे साजरा केल्याबद्दल रिगल कॉलेज, शृंगारतळीचे कौतुक केले. Wild Vegetable Festival at Regal College

या महोत्सवांतर्गत प्रा. कुणाल मंडलिक यांनी आपल्या रानमाया- 2025 या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये कोकणातील ४८ रानभाज्यांची ओळख व त्यांचे औषधी गुणधर्म सांगितले. यामध्ये टाकळा, चुंच, लाजाळू, सुरण, भारंगी, अळंबी, शेवगा, रानकेळी, गुळवेल इ.भाज्यांचा समावेश होता. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी गुणकारी व विविध आजारांना दूर ठेवणाऱ्या रानभाज्यांचे आपण संवर्धन केले पाहिजे तसेच आपली खाद्यसंस्कृती टिकवली पाहिजे असे सांगितले. मंडलिक यांनी कोकणामध्ये रानभाज्यांमार्फत होऊ शकणाऱ्या संभाव्य पर्यटनाचे तसेच रोजगाराचे यशस्वी उद्योजकांची माहिती देऊन स्पष्टीकरण केले तसेच विद्यार्थ्यांना देखील अशा प्रकारचे संभाव्य उद्योग करून आपल्या उद्योजकतेला चालना देण्याचा सल्ला दिला. Wild Vegetable Festival at Regal College
या स्पर्धेचे परीक्षण श्री.फिरोज नजामुद्दीन पिरजादे (प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय, पालशेत) तसेच श्री.कुणाल मंडलिक यांनी केले. खुल्या गटात प्रथम व द्वितीय क्रमांक अनुक्रमे श्री.मकरंद विचारे, श्रीम. लक्ष्मी चव्हाण यांना तसेच महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कु.शुभम माळी, कु.श्रीशांत पवार, कु.तनुजा पाटील तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक कु. चंदना आरेकर व कु.मुस्कान मणियार यांना मिळाला. या महोत्सवांतर्गत शेतकरी तसेच नागरिकांमार्फत विविध रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या महोत्सवाला विविध विभागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी भेट दिली. Wild Vegetable Festival at Regal College
रिगल कॉलेज शृंगारतळीच्या नेचर क्लबमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रा.विक्रम खैर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.सूत्रसंचालन प्रा.सोनाली मिरगल तसेच आभारप्रदर्शन सौ.मोरे मॅडम यांनी केले. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा श्री संजय राव शिर्के संचालिका शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ.मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. Wild Vegetable Festival at Regal College