जैवविविधतेच्या वाढीसाठी सकारात्मक बाबत
गुहागर, ता. 17 : शहरातील अष्टवणे गणपती मंदिर या डोंगराळ परिसरात रानटी कुत्र्यांचे दर्शन काहींना घडले. याची खातरजमा करण्यासाठी अक्षय खरे यांनी या परिसरात छुमे कॅमेरे लावले. त्यामध्येही रानटी कुत्र्यांचे छायाचित्र टिपले गेले. त्यामुळे गुहागरच्या डोंगराळ भागात रानटी कुत्रांचे अस्तित्व असल्याचे सिध्द झाले आहे. Wild dog sighting in Guhagar area
पाळीव कुत्र्यांप्रमाणेच दिसणाऱ्या ह्या रानटी कुत्र्यांना ढोले किंवा कोळसुंदा म्हणून ओळखले जाते. कोळसुंदा हा घनदाट जंगलात गटागटाने राहतो. मांसाहारी असलेला रानटी कुत्रा माणसांना मात्र घाबरतो. त्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्याचा वावर अपवादाने होतो. विविध कारणांमुळे होणाऱ्या जंगलतोडीमुळे रानटी कुत्र्यांची प्रजाती आज संकटात सापडली आहे. भारतातील त्यांचे अस्तित्व चिंताजनक आहे. या पार्श्वभुमीवर गुहागर शहरातील अष्टवणे, परटवणे या भागात रानटी कुत्र्यांच्या दर्शन महत्त्वाचे मानले जात आहे. Wild dog sighting in Guhagar area


अष्टवणे मंदिर परिसरात नियमीतपणे काहीजण सकाळी चालण्यासाठी जातात. त्याच्यापैकी मनिष खरे यांना प्रथम कोळसुंदा दिसला. नेहमीच्या कुत्र्यांपेक्षा दिसायला थोडा वेगळा आणि माणसाचे अस्त्तित्वाने पळून जाणारा हा प्राणी कोल्हा किंवा कुत्रा नाही याची मनिष खरे यांना जाणिव झाली. त्यामुळे मनिष खरे यांनी ही माहिती वरचापाट येथील पर्यावरणप्रेमी, वन्य जीवांचा अभ्यास करण्याची आवड असणारे अक्षय खरे यांना दिली. त्यानंतर अक्षय खरे यांनी वन्य जीवांच्या हालचाली टिपणारे छुमे कॅमेरे अष्टवणे मंदिर परिसरातील जंगलवाटांवर लावले. दोन दिवसांनी हे कॅमेरे पाहिल्यावर या परिसरात रानटी कुत्रे अर्थात कोळसुंदा (ढोल) असल्याचे सिध्द झाले. ही छायाचित्रे त्यांनी वन्यजीव अभ्यासकांना पाठवली. त्यावेळी सर्वांनी भारतात दुर्मिळ होत चाललेल्या या प्रजातीचे रक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. Wild dog sighting in Guhagar area


याबाबत अक्षय खरे म्हणाले की, यापुर्वी कधीच कोळसुंद्यांचा वावर आढळून आला नव्हता. दुर्मिळ होत चालेल्या रानटी कुत्र्यांचे दर्शन घडणे ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जैवविविधतेचे संवर्धन करुन या प्रजातीची वाढ करण्याची जबाबदारी आता आपली आहे. रानटी कुत्रे सर्वसाधारणपणे मानवी वस्तीत शिरत नाहीत. त्यामुळे त्यांचा येथील मनुष्यवस्तीला कोणताही धोका नाही. Wild dog sighting in Guhagar area