4 मे पासून प्रवेश सुरु; या गोष्टी पहाता येणार
Guhagar News Special : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या शेगावमध्ये बंद असलेले (Why was Anand Sagar closed?) आनंद सागर अध्यात्मिक केंद्र बुधवार दिनांक ४ मे पासून सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरु करण्याचा निर्णय श्री गजानन महाराज संस्थान, शेगावने जाहीर केला. सध्या या ठिकाणी जाण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीए. त्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मात्र लगेचच आनंद सागर अध्यात्मिक केंद्रातील टॉय ट्रेन, मत्सालय, म्यूजिकल फाउंटेन, आदी मनोरंजनाचे उपक्रम बंद रहाणार असल्याचेही संस्थानने जाहीर केले आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीत शेगांवला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव
गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे. स्वच्छ व सुंदर परिसर. उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व प्रामाणिक सेवेकरी. आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने विविध कार्य. ही या संस्थांनची वैशिष्ट्य आहेत. या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या सेवा करण्यासाठी आजुबाजुच्या गावातून हजारो लोक सेवेकरी म्हणून विनामोबदला काम करण्यासाठी येत असतात. मंदिरात सेवेकरी म्हणून काम केले की जीवनातील अनेक संकटांवर मात करण्याची बुद्धी आणि शक्ती श्री गजानन महाराज देतात अशी सेवेकऱ्यांची श्रध्दा आहे. म्हणुनच विना मोबदला सेवा करणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी देखील इतकी असते की, सेवेसाठी काही वर्षेसुद्धा तिष्ठत राहावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करुन संस्थानने आपली व्यवस्थापन कार्यप्रणाली बनवली आहे. त्याचवेळी साधेपणाने, नम्रपणाने भक्तांना सेवा दिली जाते. Why was Anand Sagar closed?
यात्रेकरुंसाठी उत्तम व्यवस्था असलेले भक्तनिवास, दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शनानंतर प्रसाद, देणगीची व्यवस्था, धान्य धारणेसाठी स्वतंत्र कक्ष, मंदिराशेजारी आणि भक्तनिवासांचे ठिकाणी अल्पदरात भोजनाची व्यवस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून मंदिर आणि भक्तनिवासापर्यंत मोफत वाहन व्यवस्था अशा विविध व्यवस्था संस्थानने यात्रेकरुंसाठी केल्या आहेत.


History of Anand Sagar Udyan
पूर्वीच्या काळी शेगांव हे छोटसं गाव होत. या गावातील गुरे ज्या परिसरात चरायला जायची. याच परिसरात एक प्राचीत तलावही होता. या तलावासह तेथील सुमारे दिडशे एकर जमीन त्या जागा मालकीणीने सरकारला दान केली. ही जमीन पुढे सरकारने इ क्लास म्हणून घोषित केली. गुरांना पाणी मिळावे म्हणून शासनाने 1971 मध्ये तलावाची डागडुजी केली. या परिसरातील सुमारे 250 एकर जागा शासनाने श्री गजानन महाराज संस्थानला भाडेकरारावर दिली. संस्थानने तलावाचे सुशोभिकरण केले. येथे भक्तनिवास बांधला, अध्यात्मिक केंद्र बांधले. 2001 च्या दरम्यान या परिसराचा शेगांव संस्थानने उत्कृष्ट असा विकास केला. स्वामी विवेकानंद ध्यान केंद्राबरोबरच या परिसरात लहान मुलांसाठी उद्याग, विविध साहसी खेळांची बाग, झुलता पुल, मत्स्यालय, टॉय ट्रेन, बोटींग, म्युझिकल फाऊंटन शो, ओपन थिएटर, कॉफी हाऊस असे पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू (Tourist Attractions) ठरतील असे उपक्रम उभे केले. आकर्षकता, सौंदयाला उत्तम नियोजन व व्यवस्थापन, स्वच्छता, यांची जोड मिळाली आणि आनंद सागर अध्यात्मिक केंद्र व उद्यानाची ख्याती जगभर पसरली. तीर्थक्षेत्राबरोबरच आनंद सागर उद्यानामुळे शेगाव हे पर्यटनस्थळ (Tourism) म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वाभाविकच वर्षभरात लाखोंच्या संख्येने पर्यटक, यात्रेकरु, वारकरी येथे येऊ लागले. Why was Anand Sagar closed?


Why was Anand Sagar closed?
दिवसेंदिवस वाढत चालेल्या गर्दीमुळे श्री गजानन महाराज तीर्थक्षेत्राची जागा संस्थानला कमी पडु लगाली. त्यामुळे संस्थानने शासनाने अधिक जागेची मागणी केली. या नवीन जागा मिळाल्यावर काही ठिकाणचे जुने बांधकाम पाडून नव्या जागेत संस्थानला बांधकाम करायचे होते. परंतू नव्या जागेत दुकान थाटलेल्या एकाने दुकान हलविण्यास नकार दिला. या विषय कोर्टापर्यंत पोचला. चार ते पाच वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल शेगाव संस्थानच्या बाजूने लागला. मात्र त्यावेळी सरकारकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या जागेत कोणताही व्यावसायिक वापरासाठी करता येणार नाही हे कोर्टाने स्पष्ट केले.
दरम्यानच्या काळात शासनाकडून जमीन भाडेतत्त्वावर घेतलेल्या कराराची मुदत 2018 मध्ये संपली. कोर्टाचा निर्णय आणि संपलेला करार यांचा योग जुळून आल्याने सरकारकडून श्री गजानन महाराज संस्थान, शेगावला पुन्हा ही जागा भाडेकराराने मिळाली नाही. त्यामुळेच आनंद सागर अध्यात्मिक आणि पर्यटन केंद्र बंद करण्याचा निर्णय शेगांव संस्थानने घेतला. Why was Anand Sagar closed?


Anand Sagar Started Now
भाडेकराराने शेगांव (Shegaon) संस्थानला जागा देण्याचा निर्णय गेल्या काही महिन्यात झाला आहे. असे खात्रीलायक वृत्त आहे की, आधीच्या सर्व घटनाक्रमांचा विचार करुन नवा भाडेकरार करण्यात आला आहे. या कराराची मुदतही जवळपास 30 वर्षांची आहे. कायदेशीर मार्ग मोकळा झाल्यामुळेच 4 मे 2023 पासून आनंद सागर पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय शेगांव संस्थानने घेतला आहे.
श्री गजानन महाराज संस्थानने दिलेल्या माहितीनुसार आध्यात्मिक केंद्राचा काही भाग कोविड काळानंतर आहे त्या स्थितीमध्ये सुरु करण्यात आलेला आहे. प्रवेश सेवार्थ (निःशुल्क) राहील. वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. सायंकाळी ४ वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. शासन निर्देशानुसार कोविड काळामध्ये काही अपवाद वगळता गेली दोन वर्षे श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या बंद काळामध्ये निधी अभावी श्री संस्थेचे सर्व सेवाभावी उपक्रम व नियोजीत अत्यावश्यक विकास कामे थांबविण्यात आली होती. श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व सेवाकार्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर, आर्थिक घडी निट बसल्यावर तसेच आवश्यक सेवाधाऱ्यांची सेवा व मुबलक पाणी उपलब्ध झाल्यावर आध्यात्मिक केंद्राची देखभाल-दुरुस्ती, काही भागाचे पुनर्निर्माण व पुढील विकास कार्ये हाती घेण्यात येतील. यास बराच कालावधी लागणार आहे. Why was Anand Sagar closed?