Guhagar News : भारतातील ऊर्जा क्षेत्रातील बदलांचे वारे आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती गॅस वापराबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण धोरणात्मक संकेत दिले असून, ज्या भागात ‘पाइप्ड नॅचरल गॅस उपलब्ध आहे, तेथे तो त्वरित घेण्याचे आवाहन केले आहे. हे कनेक्शन घेण्यास टाळाटाळ करतील, त्यांचे सध्याचे एलपीजी कनेक्शन पुढील ३ महिन्यात ब्लॉक केले जाऊ शकते या निर्णयामुळे आता ग्राहकांना अनिवार्यपणे पाईपलाईनच्या गॅसकडे वळावे लागणार आहे. यानिमित्ताने सरकार हा निर्णय का घेत आहे, जागतिक राजकारणाशी याचा काय संबंध आहे व सामान्य माणसाच्या खिशावर व सुरक्षेवर याचा काय परिणाम होईल, याचे सविस्तर विश्लेषण करणे आवश्यक ठरते. Why the insistence on PNG?
केंद्र सरकारचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की, देशातील जास्तीत जास्त घरगुती ग्राहकांनी द्रवीकृत पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजीऐवजी नैसर्गिक वायू म्हणजेच पीएनजीचा अवलंब करावा. सध्या भारतात सुमारे ३३.२ कोटी एलपीजी वापरकर्ते आहेत. यामध्ये साधारण १० कोटी ग्राहक हे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत येतात. गॅस सिलेंडरांच्या वितरणाची मोठी साखळी व त्यावरील वाढते अनुदान हे सरकारसाठी आर्थिक आव्हान ठरत आहे. त्यामुळेच, जिथे पायाभूत सुविधा तयार आहेत, तिथे पाईपलाईनद्वारे गैस पोहोचवणे, हा अधिक कार्यक्षम मार्ग मानला जात आहे. Why the insistence on PNG?
एलपीजीमध्ये प्रोपेन व ब्युटेन या वायूंचे मिश्रण द्रव स्वरूपात असते. ते कच्चे तेल शुद्धीकरण प्रक्रियेतून किंवा नैसर्गिक वायू प्रक्रियेतून मिळवले जाते. हा वायू सिलेंडरमध्ये भरून ट्रकद्वारे घरांपर्यंत पोहोचवला जातो. याउलट, पीएनजीमध्ये प्रामुख्याने मिथेन असतो. हा वायू थेट जमिनीखालील नैसर्गिक वायू क्षेत्रांमधून पाईपलाईनच्या जाळ्याद्वारे तुमच्या किचनमधील शेगडीपर्यंत पोहोचतो. पीएनजीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचे २४ तास उपलब्ध असणे. यामध्ये सिलेंडर संपण्याची किंवा नवीन बुकिंगची चिंता नसते. Why the insistence on PNG?
आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले, तर पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतो. सध्याच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एलपीजीच्या १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ९१२.५० रुपये आहे, तर दिल्लीत हीच किंमत ९१३ रुपये आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला किमान एक सिलेंडर लागतो. मात्र, पीएनजीच्या बाबतीत महिन्याचे बिल साधारणपणे ७०० ते ८०० रुपयांच्या दरम्यान येते. दरमहा एका कुटुंबाची ११३ ते २१३ रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. याशिवाय, सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी द्यावे लागणारे अतिरिक्त शुल्क व शारीरिक कष्टांचीही बचत होते. सुरक्षेच्या आघाडीवरही पीएनजीचे पारडे जड आहे. पीएनजीमध्ये वापरला जाणारा मिथेन वायू हा हवेपेक्षा हलका असतो. त्यामुळे जर कधी गॅस गळती झालीच, तर तो वायू घरात साचून न राहता वरच्या दिशेने हवेत विरघळून जातो. यामुळे आग लागण्याचा किंवा स्फोटाचा धोका कमी होतो. याउलट, एलपीजी हा हवेपेक्षा जड असतो. गळती झाल्यास तो जमिनीवर साचून राहतो व घराचा दरवाजा उघडला किंवा विजेचे बटण चालू केले तरी मोठ्या स्फोटाला निमंत्रण देऊ शकतो. पीएनजीच्या वितरण यंत्रणेत ठिकठिकाणी सुरक्षा व्हॉल्व्ह असतात. यामुळे गळतीची माहिती ऑपरेटर कंपनीला तत्काळ मिळते व काही मिनिटात दोष निवारण केले जाते. Why the insistence on PNG?

पर्यावरणपूरक इंधन म्हणूनही पीएनजीला पसंती दिली जात आहे. सुरुवातीला पीएनजी कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना ५,००० ते ७,००० रुपयापर्यंतची सुरक्षा ठेव भरावी लागते. ही रक्कम एकदाच भरावी लागत असली, तरी भविष्यात जेव्हा तुम्ही कनेक्शन बंद करता तेव्हा ही पूर्ण रक्कम परत मिळते त्यामुळे हा खर्च एक प्रकारची गुतवणूकच ठरते. भारताला पीएनजीसाठी लागणारा नैसर्गिक वायू घरगुती स्तरावर कृष्णा-गोदावरी खोरे (केजी बेसिन), आसाम व त्रिपुरा येथील क्षेत्रातून मिळतो. Why the insistence on PNG?
भारतातील अनेक जुन्या शहरांमध्ये रस्ते अरुंद आहेत व इमारतींचे बांधकाम दाटीवाटीचे आहे. अशा ठिकाणी गॅसच्या पाईपलाईन्स टाकणे तांत्रिकदृष्ट्या कठीण व धोकादायक असते. काही जुन्या इमारतींमध्ये गॅस पाईप्स बसवण्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षित शाफ्ट्स उपलब्ध नसल्याने तिथे पीएनजी पोहोचवणे कठीण जाते. अनेक वर्षांपासून सिलेंडर वापरण्याची सवय असलेल्या ग्राहकामध्ये पाईपद्वारे येणाऱ्या गॅसच्या सुरक्षिततेबाबत अजूनही शंका आहे. Why the insistence on PNG?