रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास दापोली मंडणगड, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे. एकमात्र चिपळूण संगमेश्र्वर लांजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत. आमदार उदय सामंत कॅबिनेट मंत्री आहेत. तरी देखील उत्तर रत्नागिरीच्या शिवसेनेत असंतोष खदखदतोय. (Why Shiv Sainiks Are dissatisfied) पालकमंत्री ॲड. अनिल परब आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना बदला. अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. त्याची कारणे सांगताना हे दोन्ही मंत्री उत्तर रत्नागिरीकडे दुर्लक्ष करतात असे सांगितले जाते. ही गोष्ट देखील खरीच आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी आजवर उत्तर रत्नागिरीमधील विकासाबाबत कधीही दौरा केला नाही. वादळाचा अपवाद वगळल्यास येथील जनतेच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतले नाही. वादळग्रस्तांना दिलेली आश्र्वासने पूर्ण झाली का याची माहिती जनतेकडून घेतली नाही. शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबुत करण्यासाठी आले नाहीत. शिवसैनिकांबरोबर संवाद साधला नाही. महाविकास आघाडीमध्ये पदाधिकाऱ्यांची भुमिका काय असावी याचे मार्गदर्शन केले नाही. पालकमंत्री उत्तर रत्नागिरीत आले ते कोणत्या तरी कार्यक्रमाला किंवा आदित्य ठाकरेंच्या बरोबर. या पलिकडे जावून पाच तालुक्यातील प्रशासनाला सोबत घेवून त्यांनी बैठका केल्या नाहीत. Why Shiv Sainiks Are dissatisfied
दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री अनिल परब यांनी स्थानिक आमदार योगेश कदम यांना दूर लोटले. वास्तविक आमदार योगेश कदम हे जनतेच्या मतांवर निवडून आलेले उदयोन्मुख, युवा नेतृत्त्व आहे. हेच पालकमंत्री विसरले. खासदार सुनील तटकरे यांच्या बरोबरीने जे काही केले ते सर्वसामान्य शिवसैनिकाला पटलेले नाही. दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचा विजय साजरा केला गेला. पण त्यात शिवसेनेच्या झालेल्या नुकसानीकडे परब यांनी दुर्लक्षच केले. Why Shiv Sainiks Are dissatisfied.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. ते सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ती जबाबदारी ते पूर्ण ताकदीनिशी निभावतात. शिवाय आपल्या मतदारसंघालाही वेळ देतात. पण कॅबिनेट मंत्री म्हणून जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदासंघामध्ये ते अपेक्षित वेळ देत नाहीत. वास्तविक त्यांना येथील भौगोलिक स्थिती, समस्यांची माहिती आहे. तरीही सामंत देखील कार्यक्रमाव्यतिरिक्त कधीही उत्तर रत्नागिरीत फिरकले नाहीत.
कोरोनासारख्या संकटात विशेषत: पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यावर मुंबईतील कोकणवासीयांना आपले घर सुरक्षित वाटत होते. त्यासाठी पालकमंत्र्यांनी, जिल्ह्यातील मंत्री म्हणून उदय सामंत यांनी पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा होती. पण सत्तेत महत्त्वाच्या पदावर असलेल्या या दोन नेत्यांनी फारसे मनावर घेतले नाही. त्यामुळे जनतेचे हाल झाले. दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्याची अवस्था बिकट होती. तरीही पालकमंत्री दूरच राहीले. यावेळी उदय सामंत यांनी सर्व सुत्रे हाती घेताना लोकप्रतिनिधींनाही दूर ठेवत एकला चलो रे ची भुमिका घेतली. ही गोष्ट अनेकांना पटलेली नाही. Why Shiv Sainiks Are dissatisfied
याउलट राष्ट्रवादीत असताना जिल्ह्याला आमदार भास्कर जाधव यांच्या रुपाने 9 खात्यांचे राज्यमंत्री पद आणि पालकमंत्री पद मिळाले. या संधीचा फायदा करुन घेताना आमदार भास्कर जाधव यांनी संपूर्ण जिल्ह्यात केलेला प्रवास रत्नागिरी जिल्हावासीयांनी पाहिला आहे. कोकणातील मच्छीमारांसाठी बोर्डाची स्थापना केली. भाजप शिवसेना सत्तेत असताना कोकणच्या विकासावर सभागृहात चर्चा घडवून आणली. आजही गुहागरच्या आमदार भास्कर जाधव यांचा अपवाद वगळला तर शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही. ही सार्वत्रिक तक्रार आहे.
Why Shiv Sainiks Are dissatisfied
म्हणूनच शिवसैनिकांच्यातील असंतोष, नाराजी बाहेर पडली. पण या असंतोषाला आणखीही काही कारणे आहेत. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. तरीदेखील गेल्या अडीच वर्षात आमच्या मुख्यमंत्र्याने ही कामे केली. हे सांगण्यासारखी स्थिती नाही. सत्ता आहे हे सांगण्यापुरते. पण एखादे काम घेवून मंत्रालयात गेले तर मान मिळत नाही. कामे होत नाहीत. ही देखील वस्तुस्थिती आहे. पण ती शिवसैनिकांना बोलता येत नाही. शिवसेनेच्या जिल्हानेतृत्त्वामध्ये अंतर्गत कुरबुरी आहेत. याची जाणिव शिवसैनिकांना आहे. पण जाहीरपणे बोलल्यास बेदखल केले जाईल याची भिती आहे. त्यामुळेच सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अशी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची स्थिती आहे. म्हणूनच शिवसेनेने प्रातिनिधीक स्वरुपात बाहेर पडलेल्या या असंतोषाचे जनक नेमके कोण हे शोधणे गरजेचे आहे. Why Shiv Sainiks Are dissatisfied