गुहागर, ता. 29 : मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी असलेले सौर्हादपूर्ण संबंध. त्यांना मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत ठाकरे कुटुंबाची मते न मिळणं. अशा घटनांमुळे ठाकरे गटामध्येच मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळेच राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या समितीनं नार्वेकरांच्या सुरक्षेत (Security) वाढ करण्याची शिफारस केली होती. असे आता समोरं आले आहे. Why increased security of Milind Narvekar?
शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून टाकण्यात आली. त्यावरुन मविआ आणि सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले. याच रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) माजी स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत शिंदे सरकारकडून वाढ करण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा एक्स सिक्युरिटीपासून वाय सिक्युरिटी प्लस एस्कॉर्ट (From X Security to Y Security Plus Escort) करण्यात आली आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. Why increased security of Milind Narvekar?
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सामिल होणार अशी चर्चा गेले दोन तीन महिने केली जात आहे. त्यावर खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी कधीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. किंबहुना आपल्या कृतीमधुन आपण ठाकरे गटातच असल्याचे दाखवून दिले. मात्र वेगवेगळ्या प्रसंगांमधुन मिलिंद नार्वेकर यांचे शिंदे गट आणि भाजपशी (BJP) जवळीक वाढत असल्याचे समोर येत आहे. Why increased security of Milind Narvekar?
गणेशोत्सवात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या घरी जावून गणपतीबाप्पाचे दर्शन घेतले. त्यावेळचे फोटो माध्यमांवर पसरले आणि नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या वावड्या उठल्या. पाठोपाठ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर पवार – शेलार (Sharad Pawar – Ashish Shelar Panel) पॅनेलमधुन कार्यकारीणी सदस्य पदाच्या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात होते. ते 221 मतांनी विजयी झाले. परंतु ठाकरे कुटुंबांच्या अत्यंत जवळचे असूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे तिघेही मतदानासाठी फिरकले नाहीत. Why increased security of Milind Narvekar?
या पार्श्र्वभुमीवर उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक नार्वेकरांना नाराज आहेत. सध्याच्या स्फोटक राजकीय घडामोडीत उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक नार्वेकरांच्या बाबतीत कसे रिअॅक्ट होतील. हे सांगू शकत नाही. म्हणजेच नार्वेकरांना त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांकडून धोका असल्याची माहिती (information) गुप्तचर यंत्रणा (Intelligence system) व मुंबई पोलीस (Mumbai Police) यांच्याकडे आहे. त्यामुळेच नार्वेकरांना धोका असल्याचं राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या समितीनं म्हटलं आहे. तसा अहवाल त्यांनी राज्य सरकारकडे दिला. त्यानुसार नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. Why increased security of Milind Narvekar?
Tags : CM Eknath Shinde, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, information, गुप्तचर यंत्रणा, Intelligence system, मुंबई पोलीस, Mumbai Police, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, Why increased security of Milind Narvekar?