• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आम्ही युतीचे नव्हेतर जनतेचे प्रतिनिधी म्हणून भेटलो

by Mayuresh Patnakar
March 13, 2023
in Guhagar
211 2
0
Statement regarding Guhagar Development Plan

गुहागर : येथील जनतेच्या मागणीचे निवेदन सामंत यांना देताना भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते

414
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिपक कनगुटकर, गुहागर शहर नागरिक मंचातर्फे निवेदन दिले

Guhagar News, ता. 13 : शहर विकास आराखड्यासंदर्भात आम्ही घेतलेली भेट संपूर्ण गुहागर शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी (Peoples Representative) म्हणून होती. या भेटीचा कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबध नव्हता. अशी माहिती दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. We met as a Peoples Representative

गुहागर न्यूजमध्ये युतीच्या कार्यकर्त्यांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट अशी बातमी प्रसिध्द झाली होती. ही बातमी वाचल्यावर दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजशी संपर्क साधुन वस्तुस्थिती सांगितली. 9 मार्च ला गुहागरमध्ये झालेल्या सभेमध्ये विकास आराखड्या संदर्भात पुढील सर्व कार्यवाही करण्यासाठी सर्वपक्षीय समितीची नेमणूक करण्यात आली होती. गुहागरमधील जनतेच्या भावना उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पोचवून त्यांना निवेदन देण्याचे काम सोमवारी (13 मार्चला) करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे नितीन सांगळे, खलिल माहीमकर, अशोक जांगळी, भरत कदम, शंकर गोताड, किरण खरे, संगम मोरे, हेमंत बारटक्के, दिपक कनगुटकर, निलेश मोरे, अमरदीप परचुरे, प्रथमेश दामले असे सर्वजण मुंबईला गेले होते. मात्र मंत्री उदय सामंत यांच्या वेळापत्रकात बदल झाला. त्यांनी गुहागर शहरातील समिती सदस्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी भेट घेण्याचा निरोप दिला. मुंबईमध्ये आलेले सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी निवासाला गेल्याने, काही समिती सदस्य सकाळीच मुंबईत पोचल्याने थोडी चुकामुक झाली.  काहीजण आधी ठरल्याप्रमाणे मंत्रालय परिसरात गेले. काहींना प्रवासात असल्याने बदलेल्या वेळेत पोचता आले नाही. ज्यांनी बदललेल्या वेळेचा आणि स्थानाचा व्हाटसअप संदेश वाचला असे आम्ही आठ नऊ जण मंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी पोचलो आणि निवेदन दिले. We met as a Peoples Representative

या भेटीला राजकीय रंग देणे चुकीचे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली त्यावेळीही हे निवेदन संपूर्ण गुहागरवासीयांतर्फे देण्यात येत आहे.  हे आम्ही स्पष्ट केले आहे.  त्यामुळे ही भेट राजकीय पक्षांचे पदाधिकारी म्हणून नव्हेतर गुहागर शहरातील जनतेचे प्रतिनिधी म्हणून घेतल्याचे दिपक कनगुटकर यांनी सांगितले. We met as a Peoples Representative

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWe met as a Peoples Representativeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share166SendTweet104
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.