• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू

by Mayuresh Patnakar
February 23, 2023
in Politics
241 3
0
The corporators of Guhagar met Samant brothers
474
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरसेविकांचा खुलासा, प्रामाणिकपणावर, निष्ठेवर प्रश्र्नचिन्ह दु:ख देणारे

Guhagar News : आम्ही भाजपमध्ये आहोत आणि भविष्यातही राहू. उद्योग मंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी आमच्या प्रभागांमध्ये निधी दिला. म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही नाम. उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांचे मोठे बंधू भैय्या सामंत शासकीय विश्रामगृहाजवळील त्यांच्या कार्यालयात होते. म्हणून त्यांची सदिच्छा भेट घेतली.  याची पूर्व कल्पना भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनीही दिली होती. अशी प्रतिक्रिया भाजपच्या नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे व सौ. भाग्यलक्ष्मी कानडे यांनी गुहागर न्यूज जवळ व्यक्त केली. We are in BJP and will remain in future

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

20 फेब्रुवारीला गुहागर नगरपंचायतीमधील शहर विकास आघाडीच्या चार व भाजपच्या दोन अशा एकूण सहा नगरसेविकांनी रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे जेष्ठ बंधू भैया सामंत यांची भेट घेतली होती.  यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर तालुकाप्रमुख दीपक कानगुटकर उपस्थित होते. त्यामुळे या भेटीची चर्चा गुहागरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजपच्या दोन्ही नगरसेविकांनी ना. उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना दिली होती. त्यानंतरही सुरू झालेल्या चर्चांना विराम मिळावा म्हणून गुहागर न्यूजजवळ खुलासा केला. We are in BJP and will remain in future

भाजपच्या नगरसेविका सौ. मृणाल गोयथळे म्हणाल्या की, माझ्या प्रभागातील एका पाखाडीसाठी निधी हवा होता. हा निधी नाम. उदय सामंत यांनी मंजूर करून दिला. तसेच त्यांनी घेतलेल्या रोजगार मेळाव्यात माझ्या प्रभागातील काही तरुणांनी अर्ज केले होते. त्याचा पाठपुरावा करायचा होता. या दोन्ही कामांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून नाम. उदय सामंत यांची भेट घेणे मला आवश्यक वाटले. We are in BJP and will remain in future

भाजपच्या नगरसेविका सौ. भाग्यलक्ष्मी कानडे म्हणाल्या की, आमच्या प्रभागातील नारायण मंदिर ते समुद्र पाखाडीच्या नुतनीकरणासाठी सुमारे 1 कोटीचा निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजूर केला आहे. या कामाचा प्रस्ताव आता तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हा निधी दिल्याबद्दल मंत्री सामंत यांचे आभार मानण्यासाठी सदिच्छा भेट घेण्याचे आम्ही ठरविले होते. We are in BJP and will remain in future

The corporators of Guhagar met Samant brothers
We are in BJP and will remain in future

आम्ही दोघी गेली अनेक वर्ष कोणतेही पद नसताना भाजपचे प्रामाणिकपणे काम करत आहोत. भाजपने आम्हाला नगरसेविका होण्याची संधी दिली. त्यानंतरही नगरसेविका म्हणून ज्यांनी निवडून दिले त्या मतदारांची कामे करत आहोत. प्रभागाच्या विकासासाठी झटत आहोत. पक्ष संघटना वाढावी म्हणून निस्वार्थपणे काम करत आहोत. अशावेळी तालुकाध्यक्षांना सांगून मंत्री महोदयांची भेट घेतल्यानंतरही त्याबाबत वेगळी चर्चा होत असेल, आमच्या प्रामाणिकपणावर, निष्ठेवर प्रश्र्नचिन्ह निर्माण केले जात असेल तर ते  चुकीचे आहे. We are in BJP and will remain in future

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUday SamantWe are in BJP and will remain in futureटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share190SendTweet119
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.