• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण

by Ganesh Dhanawade
November 18, 2022
in Guhagar
25 0
0
Watermelon Cultivation

Watermelon Cultivation, Training and Demonstration

49
SHARES
140
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नाविन्यपूर्ण शेतीतून उत्पन्न वाढवावे – प्रमोद केळस्कर

गुहागर, ता. 18 : पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य आहे. अशा नाविन्यपूर्ण (innovative agriculture) उपक्रमातून, प्रयोगातून शेतकऱ्यांनी (Farmer) आपले उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी वेळंब येथे केले. Watermelon Cultivation

पं.स. गुहागरच्या कृषी विभागाच्या वतीने गुहागर तालुक्यातील वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिक (Watermelon Cultivation Training and Demonstration) आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम वेळंबमधील शेतकरी संजय गुरव यांच्या कलिंगड लागवडीच्या शेतात घेण्यात आला. Watermelon Cultivation

या उपक्रमाबाबात कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर म्हणाले की, कलिंगड हे पिक इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कमी कालावधीत अधिकाधिक उत्पन्न देणारे नगदी पिक (Cash Crop) आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कलिंगडाचे उत्पन्न घ्यावे. शेतकऱ्यांना या पिकाची लागवड Watermelon Cultivation कशी करावी. कोणती काळजी घ्यावी. खते औषधे कोणती वापरावीत. पाणी कसे द्यावे. याबद्दल माहिती होण्यासाठी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक व प्रशिक्षण (Training and Demonstration) उपक्रमाचे वेळी कलिंगड लागवड करणारे शेतकरी  श्री. चव्हाण  (रा. मढाळ),  कोतळूक येथील लक्ष्मण कुंभार, विजय माळी यांनी अनुभव कथन केले. Watermelon Cultivation

सरपंच समिक्षा बारगोडे यांनी पंचायत समितीने वेळंब येथे कलिंगड लागवडीबाबत प्रात्यक्षिक (Watermelon Cultivation Training and Demonstration) आयोजित करुन  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल कृषी विभागाचे आभार व्यक्त केले. शेतीबाबत agriculture आमच्या शेतकऱ्यांना असेच सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळावे. अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

या उपक्रमाचे वेळी वेळंबच्या सरपंच समिक्षा बारगोडे, उपसरपंच श्रीकांत मोरे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य परशुराम गाडे, सुरेश जाधव, जयश्री जाधव, श्वेताली घाडे, वैष्णवी घाडे, प्रगती माळी, प्रिया जाधव, पोलीस पाटील स्वप्नील बारगोडे, ग्रामसेवक आर. बी. राठोड, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण कुंभार, शेतकरी संजय गुरव, संदिप गुरव, विजय माळी, रविंद्र कारकर, चव्हाण, विजय रांजाणे, अनिल देवस्थळी, गोपाळ मोरे, कुणाल बारे, पंकज निर्मळ, मेघश्याम गुरव, आदी शेतकरी उपस्थित होते. ग्रामसेवक राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. Watermelon Cultivation

Tags : innovative, agriculture, Watermelon, Cultivation, Training, Demonstration, farmer, कलिंगड लागवड, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक, नगदी पिक, cash crop, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Watermelon Cultivation,

Tags: AgriCulturecash cropCultivationDemonstrationFarmerGuhagarGuhagar NewsinnovativeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTrainingWatermelonWatermelon Cultivationकलिंगड लागवडटॉप न्युजताज्या बातम्यानगदी पिकप्रशिक्षणप्रात्यक्षिकमराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.