• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 April 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथील मुख्य जलस्त्रोत प्रदूषित

by Guhagar News
April 10, 2026
in Guhagar
48 0
0
Water Source at Shringartali Polluted
93
SHARES
267
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील शृंगारतळी आबलोली फाटा येथील नाल्यामध्ये सांडपाणी सोडण्यात आल्याने जानवळे ग्रामपंचायतीच्या विहीरींसह खाजगी सर्वच विहीरी प्रदुषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्याचबरोबर पालपेणे फाटयाजवळील नाल्यामध्येही सांडपाणी सोडले जात असल्याने पाटपन्हाळे ग्रामपंचायतची विहीर प्रदूषित होण्याची शक्यता बळावली आहे. Water Source at Shringartali Polluted

गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर यांनी लक्ष केंद्रीत केले असून घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक घेतली. यामध्ये शृंगारतळीतील अनधिकृत बांधकामाचाही विषय गाजणार आहे. या गंभीर प्रकारावर आळा घालण्यासाठी दोन्ही गावाच्या ५ सदस्यांची कमिटी तयार करावयास सांगितले आहे. सदर कमिटीने नाल्यामध्ये कोणाचे पाणी कशापद्धतीने सोडले जात आहे, शौचालयाचे मलमूत्रही सोडले जात आहे, याची पाहणी करणार असून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. Water Source at Shringartali Polluted

यामध्ये दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याचाही इशारा दिला असून सदर सांडपाणी तातडीने बंद करण्याबाबतची जलदगतीने कारवाई होणार आहे. पाणी स्रोत चांगले राखणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. जर कोणी पाणी प्रदूषित करत असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले. यासाठी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी, कर्मचारी, ग्रामस्थांसमवेत सोडण्यात येणार्‍या सांडपाण्याच्या जागेची पाहणी केली. Water Source at Shringartali Polluted

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWater Source at Shringartali Pollutedटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.