संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याचा जिल्हा वार्षिक योजनाअंर्गत उपक्रमशिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी नासा – इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अतिम निवड यादी जाहीर झाली आहे. जिल्हा परिषद शाळास्तरावर २५१ केंद्रांवर २० हजार ५११ विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा नुकतीच घेण्यात आली होती. त्यातून एकूण ५५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यातील २० मुले नासासाठी निवडली गेली आहेत. यामध्ये पाभरे शाळेतील विद्यार्थी विराज विष्णू नाचरे याची नासा व इस्रोसाठी निवड झाली आहे. Viraj selected for NASA and ISRO
जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांची केंद्रस्तर, तालूकास्तर, जिल्हास्तर अशी विज्ञान विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड नासा व इस्रो या संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी करण्यात आली. यामध्ये पाभरे शाळेतील विद्यार्थी विराज विष्णू नाचरे याने उत्तम गुण संपादन केल्याने त्याची नासा व इस्रो या दोनही संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. या विद्यार्थ्यास श्री प्रेमेंद्र युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. या यशाबद्दल विराज विष्णू नाचरे मार्गदर्शक शिक्षक श्री. प्रेमेंद्र पाटील तसेच सहकारी शिक्षक श्री. अजय जाडकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. Viraj selected for NASA and ISRO
यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती पाभरे, सर्व ग्रामस्थ पाभरे, मुंबई मंडळ पाभरे, झोंबडी केंद्र प्रमुख श्री. प्रभाकर कांबळे, झोंबडी केंद्रातील शिक्षक वृंद श्री. भारत गायकवाड, श्री. दिपक तावडे, श्रीमती. नेहा गांधी, श्रीमती. शामल पवार तसेच पाभरे शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. सदानंद कांबळे, चिखली बीट विस्तार अधिकारी श्री .गळवे, गुहागर बीट विस्तार अधिकारी श्री. अशोक गावणकर, गुहागर गटशिक्षणाधिकारी श्रीमती. लिना भागवत तसेच लायन्स क्लब गुहागर या सर्वांनी विराजचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Viraj selected for NASA and ISRO