आ. जाधव यांचे आभार मानताना हेदवी, हेदवतडच्या ग्रामस्थांना आले भरून..
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील हेदवी, हेदवतड या दोन्ही गावांतील प्रमुख ग्रामस्थ चिपळूण येथे आमदार श्री. भास्करराव जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांचे आभार मानण्यासाठी आले होते. आमदार जाधव यानी अवघ्या अडीच-तीन वर्षात कोटयवधी रूपयांची विकासकामे मंजूर केल्याबद्दल आभार मानण्यात आले. त्यावेळी हेदवी, हेदवतडच्या ग्रामस्थांना आले भरभरून आले. Villagers thank MLA Jadhav

३५-४० वर्ष आम्ही भाजपमध्ये (BJP) होतो. पण, इतक्या वर्षात जे झालं नाही ते तुम्ही अवघ्या अडीच-तीन वर्षात करून दाखवलंत. आम्ही तुमच्यापासून इतकी वर्ष दूर राहिलो, याचा आम्हाला आता पश्चाताप होतोय. आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही पण विकासकामांच्या रूपानं तुम्ही आमची मनं जिकली आहात. आता आम्ही कायम तुमच्या पाठिशी खंबीरपणे राहू..’ हे उद्गार आहेत तालुक्यातील हेदवी आणि हेदवतड गावातील ग्रामस्थांचे. Villagers thank MLA Jadhav

कोटयवधी रूपयांची विकासकामे मंजूर केल्याबद्दल या दोन्ही गावांतील प्रमुख ग्रामस्थ आमदार श्री. भास्करराव जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांचे आभार मानण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांना अक्षरशः भरून आले होते. गुहागर तालुक्यातील हेदवी, हेदवतड ही वर्षानुवर्षे भाजपला समर्थन देणारी गावं.. सन २००४-०५ मध्ये श्री. भास्करराव जाधव यांनी या तालुक्यामध्ये पाय ठेवला. बघता बघता ते विधानपरिषद सदस्य झाले, विधानसभेवर निवडून येवून मंत्री झाले आणि तालुक्यात विकासाची गंगा आली. विकासापासून कोसो दूर असलेल्या या तालुक्याचा अक्षरशः कायापालट झाला. तरीदेखील हेदवी, हेदवतडमधील बहुसंख्य ग्रामस्थांनी भाजपची साथ सोडली नव्हती. परंतु, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येवूनही गावात विकासाचे काम होत नसल्याने सुमारे अडीच वर्षांपूर्वी या ग्रामस्थांनी आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे नेतृत्व स्वीकारले आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. Villagers thank MLA Jadhav
आमदार श्री. जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांनी स्वतःहून या दोन्ही गावांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यासाठी पाठपुरावा करून कोटयवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये हेदवी हेदवतड येथील खारवीवाडा कॉजवेपासून उंबरवाडीपर्यंत संरक्षक भिंत बांधणे, हेदवतड-साखरीआगर जोडरस्ता तसेच हेदवी-हेदवतड-उमराठ-वेळणेश्वर-वाडदई असा मोठा रस्ता या प्रमुख कामांचा समावेश आहे. वर्षानुवर्षे रखडलेली ही कामे मार्गी लागत असल्याने या दोन्ही गावांतील ग्रामस्थ आनंदात आहेत. त्यामुळे आज आभार मानण्यासाठी गावची प्रमुख मंडळी आली तेव्हा त्यांच्या एका डोळयात अश्रू आणि दुसऱ्या डोळयात हसू होते. आम्ही खूप उशिर केला. आधीच आपल्यासोबत यायला हवे होते, अशी भावना प्रत्येकाची होती. Villagers thank MLA Jadhav
यावेळी हेदवीचे सरपंच गजानन हेदवकर, खारवी समाज हेदवतड गावचे पाटील मदन हेदवकर तसेच विठोबा हेदवकर, सदाशिव हेदवकर, मच्छींद्र हेदवकर, रवींद्र अडूरकर, संतोश ढोर्लेकर, शरद अडूरकर, संदीप हेदवकर, निलेश अडूरकर आदी ग्रामस्थ आमदार श्री. जाधव (MLA Shri. Bhaskarrao Jadhav) यांचे आभार मानण्यासाठी आले होते. Villagers thank MLA Jadhav
