गुहागर, ता. 19 : असगोली जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवावर, प्रशासकीय कामकाजावर आणि संघटनात्मक क्षमतेवर विश्वास ठेवत ही जबाबदारी सोपवली आहे. Vikrant Jadhav nominated from Asgoli ZP group

विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना ग्रामीण भागातील विकासकामांना विशेष प्राधान्य दिले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता तसेच शेतकरी व युवकांशी संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. त्यामुळेच त्यांची ओळख विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच असगोली गटासह संपूर्ण परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत करत नेतृत्वाचे आभार मानले आहेत. Vikrant Jadhav nominated from Asgoli ZP group
आगामी निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि सर्वसमावेशक विकासाचा अजेंडा पुढे ठेवून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची साथ मिळाल्यास असगोली जि. प. गटात विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Vikrant Jadhav nominated from Asgoli ZP group
