गुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांजवळ उपचारांबाबत चर्चा केली. यावेळी त्याच्यासोबत गुहागरमधील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Vikrant Jadhav met the injured
आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. बसेसमध्ये झालेल्या अपघातात 44 प्रवाशांपैकी 41 प्रवासी जखमी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह दोन मुलांचाही समावेश होता. त्यामुळे अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. गुहागर तालुक्यातील अंजनवेल जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव हे देखील अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी चिपळूणातून गुहागरला आले. ग्रामीण रुग्णालयात जावून त्यांनी अपघातग्रस्तांची भेट घेतली. चौकशी केली. उपचारांसंदर्भात रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी गुहागर शहरातील शिवसेना पदाधिकारी जयदेव मोरे, अमरदिप परचुरे, राकेश साखरकर, राज विखारे, विनायक जाधव, सचिन खरेआदी उपस्थित होते. Vikrant Jadhav met the injured
संबंधित बातमी : दोन एसटी समारोसमोर धडकल्या

अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सौ. नेत्रा ठाकूर, वेळणेश्र्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर, सचिन जाधव युवासेना जिल्हाधिकारी, समीर डिंगणकर आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी ग्रामीण रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured
