लाच मागितल्यास आमच्याशी संपर्क करा; पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील
रत्नागिरी, ता. 05 : कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले. दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ (Vigilance Awareness Week) निमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर कालावधीत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. Vigilance Awareness Week
या अभियानाअंतर्गत दि. १ आॕक्टोबर रोजी पोलीस उपअधीक्षक श्री. पाटील यांनी आकाशवाणी केंद्र 101.5 एफ.एम. वाहिनीवर NEWSONAIR या लाइव्ह मोबाइल अॕपद्वारे “भ्रष्टाचार निर्मूलन” या विषयावर मार्गदर्शनपर मुलाखत दिली. मुलाखतीत त्यांनी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ व संपर्क क्रमांक ०२३५२-२२२८९३ बाबत सविस्तर माहिती देत भ्रष्टाचाराविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले. “कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले. Vigilance Awareness Week

रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे जावून तेथे उपस्थित रेल्वे पोलीस व नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देण्यात आली. उपस्थित कर्मचारी व नागरिकांना हॅण्डबिलचे वाटप करण्यात आले. दर्शनी ठिकाणी भितीपत्रके लावुन जनजागृती करण्यात आली. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथील कर्मचारी व पोलीस पाटील यांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देवून लाचखोर अधिकारी /कर्मचा-यांविरुध्द ला. प्र. विभागाकडे तक्रार देण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच रत्नागिरी बस स्थानक येथेही नागरिकांना भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहिती देण्यात आली. बसस्थानकात व परिसरातील ठळक ठिकाणी भित्तीपत्रके लावून उपस्थित नागरिकांना हॅण्डबिलचे वाटप करण्यात आले. Vigilance Awareness Week
स्थानिक वृत्तपत्रे, स्थानिक वृत्त वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी केंद्र तसेच सोशल मीडियाद्वारे, विशेषतः व्हॉट्सअवअॕप ग्रुप्समधून, नागरिकांपर्यंत भ्रष्टाचाराविरोधी संदेश प्रसारित करण्यात आला आहे. तक्रारीकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडील फोन नं. ०२३५२ २२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. Vigilance Awareness Week
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील, मो. क्र. ७५८८९४१२४७, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, मो. क्र. ९८७०४७४५३५, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे मो. क्र. ९०६७०३५९१० यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. Vigilance Awareness Week