गुहागर, ता. 15 : शहरातील गुरववाडी येथे राहणाऱ्या श्रीमती विद्या विजय गुरव यांचा दिनांक १३ ऑक्टोबर रोजी “नारी सन्मान प्रतिष्ठान” चिपळूण यांच्यातर्फे नारी सन्मान कार्य गौरव पुरस्कार व नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. हा सन्मान विद्या गुरव यांच्या राहत्या घरी येऊन देण्यात आला. सध्या त्या चिपळूण येथे वास्तव्याला आहेत. Vidya Gurav receives various awards

विद्या गुरव ह्या कष्टकरी महिला आहेत. त्यांनी लहान पणापासून ते वयाच्या ५५ वर्षापर्यंत अविरतपणे चिकाटी, जिद्द न सोडता कष्टाची कामे करून स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी मुलाचे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्याला योग्य दिशा दिली. एक स्त्री असून चूल आणि मूल धरून न राहता कामासोबतच आपल्या अंगी असणाऱ्या कविता लेखन _ सादरीकरण, एकपात्री अभिनय, पाककला स्पर्धा, मंगळागौर कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय निमंत्रित कवींच्या काव्य संमेलनामध्ये सहभाग नोंदवला. अशा विविध कला जोपासत त्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व उभं केले आहे. Vidya Gurav receives various awards
याबाबत श्रीमती विद्या विजय गुरव यांना नारी सन्मान कार्य गौरव पुरस्कार व नवदुर्गा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी “नारी सन्मान प्रतिष्ठान” चिपळूणचे अध्यक्ष सौ.प्रियांका कारेकर, सचिव सौ.तेजल पेढांबकर, कोषाध्यक्ष नाझिमा सकवारे आदी मान्यवर उपस्थितीत होते. Vidya Gurav receives various awards
