कन्हैया स्टार आयोजन ; सागर पुत्र असगोली, उपविजेता
गुहागर, दि. 21: खालचापाट येथील कन्हैया स्टार क्रीडा मंडळतर्फे स्पर्धा आयोजित केली होती. तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत विधाता असगोली संघाने विजेता पद पटकावले .तर सागर पुत्र असगोली संघाने उपविजेतेपद पटकावले.
विधाता असगोली संघाने कोतळूक संघाचा तर सागर पुत्र संघाने वेळणेश्वर संघावर मात करत अंतिम सामन्यासाठी प्रवेश केला. विजेत्या संघास रोख 15 हजार रुपये, तर उपविजेत्या संघास रोख दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील मालिकावीर राजेश धनावडे (विधाता असगोली), उत्कृष्ट फलंदाज मनीष पावसकर (सागरपुत्र), गोलंदाज ऋतिक तिमसेकर (सागरपुत्र), अंतिम सामन्यातील सामनावीर व क्षेत्ररक्षक कुंदन रोहिलकर, उगवतातारा आयुष वाडकर यांची निवड करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून सचिन गोयथळे यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी माजी सरपंच रजनीनाथ वराडकर, संदीप मोरे, नरेंद्र वराडकर, अशोक गोयथळे, रवींद्र विखारे, प्रकाश गोयथळे, संतोष वराडकर, हेमचंद्र आरेकर, शोधन वराडकर, मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे, उपाध्यक्ष तेजस वराडकर, श्रीरंग वराडकर, तनय गोयथळे, उमेश गोयथळे आदी उपस्थित होते.