भाजपचे प्रदेशाध्यक्षांची अवधूत वेल्हाळ यांच्या बरोबर चर्चा
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील कै. सुशीलप्पा वेल्हाळ यांचे सुपुत्र श्री. अवधूत वेल्हाळ व त्याच्या मित्र परिवाराने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. शृंगारतळी येथील गौरव वेल्हाळ व अवधूत वेल्हाळ हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती असल्याचे तालुका वासियांना माहित आहे. जेव्हा शरद पवार साहेबांचा गुहागरच्या आसपास दौरा होतो. तेव्हा शरद पवार साहेब वेल्हाळ कुटुंब यांचे निवासस्थानी भेटायला आवर्जून येतात. गौरव वेल्हाळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. Velhal and Chavan’s meeting sparks discussions

अवधूत व गौरव वेल्हाळ यांचे वडील कैलासवासी सुशील आप्पा वेल्हाळ हे पूर्वाश्रमी भाजपचे प्रमुख कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवेशाला स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब स्वतः उपस्थित होते. यावरून वेल्हाळ परिवार आणि शरद पवार यांच्यातील जवळीक दिसून येते, त्यातच सुशील आप्पा वेल्हाळे यांचा अजातशत्रू स्वभाव, तालुक्यात कोणत्याही गरजवंताला मदत करणे, वेळेप्रसंगी मदतीला धावून जाणे व राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी जपणे, यामुळे त्यांचा गुहागर तालुका व परिसरातील तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत जवळचा व घरोब्याचा परिचय व दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या पश्चात तोच वारसा गौरव वेल्हाळ व अवधूत वेल्हाळ यांनी सुरु ठेवला आहे. Velhal and Chavan’s meeting sparks discussions

वेल्हाळ परिवाराचे राजकारणापलीकडे जाऊन अनेक लोकांजवळ चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत व ते त्यांनी जपले आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिकांचे पडघम वाजू लागले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटात व भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. याच दरम्यान अवधूत वेल्हाळ यांनी रवींद्र चव्हाण यांची घेतलेली भेट. यामुळे राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत गौरव वेल्हाळ यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे. Velhal and Chavan’s meeting sparks discussions