विद्यार्थ्यांनी घेतले शैक्षणिक अनुभवाचे प्रत्यक्ष धडे
गुहागर, ता. 19 : जि. प. पूर्ण प्राथमिक वेलदूर नवानगर शाळेची क्षेत्रभेट गुहागर एसटी आगार, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री गणपती मंदिर, श्री व्याडेश्वर मंदिर, तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी देवीचे मंदिर, काशविंडा बीच, श्री वेळणेश्वर मंदिर, लक्ष्मी गणेश मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमा सोबतच प्राचीन कला परंपरा यांचे दर्शन घडविण्यात आले. विविध मंदिरातील स्थापत्यशैली, ग्रामीण कलाकार, लघु उद्योजक, ग्रामीण जीवन, गुहागर तालुक्याला लाभलेला प्राचीन वारसा याबाबत प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. Veldur Navanagar School’s field trip to Kashvinda

यावेळी गुहागर एसटी आगार ला भेट देऊन आगार व्यवस्थापक श्री अशोक चव्हाण यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. सर्वसामान्य यांच्या आयुष्यात एसटीचे स्थान किती महत्त्वाचे आहे याची सविस्तर माहिती चव्हाण साहेब यांनी दिली. ग्रामीण भागाचे जीवनमान एसटीवर अवलंबून आहे. गुहागर आगाराचे डेपो मॅनेजर श्री अशोकराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना हिरकणी कक्ष, वाहतूक कक्ष, यांत्रिक विभाग, आरक्षण कक्ष, डिझेल विभाग, आर्थिक व्यवहार, गुहागर आगारामध्ये समाविष्ट सेवेत असलेल्या एसटी बसेस, सर्विसिंग विभाग यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या त्या विभागात जाऊन माहिती दिली. विद्यार्थ्यांनी काही गाड्यांचे अनाउन्सिंग केले. त्यावेळी त्यांचे समवेत सहाय्यक एसटी अधिकारी श्री पवार, श्री मंदार साहेब यांत्रिक विभाग हे होते. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले. Veldur Navanagar School’s field trip to Kashvinda

निसर्गाच्या कुशीत तवसाळ येथील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री महामाई सोनसाखळी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी निसर्ग संपन्न परिसराचा मनमुराद आनंद घेतला. काशविंडा बीच मध्ये प्रेक्षणीय सागरी किनाऱ्यावर विविध खेळ मनसोक्त खेळले. विद्यार्थी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन कृतिशीलतेने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याने व नाविन्यपूर्ण अनुभवाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. Veldur Navanagar School’s field trip to Kashvinda

क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील, उपक्रमाचे समन्वयक अफसाना मुल्ला, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड यांनी प्रयत्न केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शिल्पा कोळथरकर, उपाध्यक्ष श्री रवींद्र जांभारकर, श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधाकर कांबळे, पत्रकार श्री संतोष घुमे यांचे सहकार्य लाभले. Veldur Navanagar School’s field trip to Kashvinda
