गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे सोमवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी रानगवा मृतावस्थेत मिळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी गुहागरचे वनपाल संतोष परशेटे यांना सांगितले. वनविभागाला माहिती कळताच त्यांनी रान गव्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Velamb Nalewadi Found dead is Yak


वेळंब नालेवाडी येथे रानगवा मृतावस्थेत मिळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी गुहागरचे वनपाल संतोष परशेटे यांना सांगितले असता रान गव्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. व रानगव्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. Velamb Nalewadi Found dead is Yak


याप्रसंगी विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूणचे सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण राजश्री किर, गुहागरचे वनपाल संतोष परशेटे, वनरक्षक संजय दुंडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरे, तसेच यावेळी बाळू ओक, जगन्नाथ बाक्कर, हरेश पटेल, योगेश पानवलकर, विनायक काताळकर, मंगेश गोलांबडे, रमाकांत सोलकर, इलियास माळगुंकर, संतोष जाधव व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर रानगव्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Velamb Nalewadi Found dead is Yak